भुजबळ,कोकाटे, झिरवाळ यांच्या विरोधात तगडे उमेदवार मैदानात

नाशिक : राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीने विधानसभेच्या निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून .या आधी शरद पवार गटाने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यावेळी 22 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत छगन भुजबळ,नरहरी झिरवळ, माणिकराव कोकाटे यांच्या समोर शरद पवार यांनी तगडे आव्हान उभे केल्याचे दिसते.राहुल ढिकलें विरुद्ध गणेश गिते नाशिक पूर्व मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात शरद पवार यांच्याकडून तगड्या नेत्याचा शोध सुरू होता. अखेर भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गिते यांनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेत तुतारी हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.त्यामुळे आता पूर्व मतदारसंघात राहुल ढिकलें विरुद्ध गणेश गिते अशी लढत रंगणार आहे. या लढतीत कोण बाजी मारणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे . छगन भुजबळ यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार कोण ? येवला विधानसभा मतदारसंघात मंत्री व अजित पवार राष्ट्रवादी गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने माणिकराव शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असणार आहे. माणिकराव कोकाटे यांच्या विरोधातला उमेदवार सिन्नर विधानसभा मतदारसंघात अजित गटाच्या राष्ट्रवादीचे नेते व विद्यमान आमदार यांच्याविरोधात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने उदय सांगळे यांना उमेदवारी दिली असून, काही दिवसांपूर्वी सांगळे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता या लढतीकडे देखील सिन्नरकरांचे लक्ष लागून असणार आहे. नरहरी झिरवळ यांच्या विरोधात हा उमेदवार दिंडोरी विधानसभा मतदारसंघात नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कडून सुनिता चारोस्कर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.तर बागलाण विधानसभा मतदारसंघातून दीपिका चव्हाण यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांचा सामना भाजपचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांच्याशी होणार आहे

![]()











