• Latest
  • Trending
ज्यांचा गृहमंत्री जेल मध्ये गेला त्यांनी कायदा शिकवू नये

ज्यांचा गृहमंत्री जेल मध्ये गेला त्यांनी कायदा शिकवू नये

October 16, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

ज्यांचा गृहमंत्री जेल मध्ये गेला त्यांनी कायदा शिकवू नये

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

महायुतीचे रिपोर्ट कार्ड सादर

नाशिक : महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्ष ऍक्टिव्ह मोड मध्ये आले असून महायुतीने प्रचाराला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महायुतीच्या रिपोर्ट कार्डचे उद्धाटन आज मुख्यमंत्री आणि दोघे उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झालं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार ,केंद्रीय मंत्री रामदास आठवले, सदाभाऊ खोत उपस्थित होते. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले आमच्या समोरच्या लोकांनी फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला. आमचे महायुतीचे २०२२ ते २०२४ चे रिपोर्ट कार्ड देत आहोत. काहींनी महायुती सरकारने तिजोरी मोकळी केली असे आरोप केले. शेवटच्या अर्थसंकल्पमध्ये काही तरतुदी केल्यात त्यावर टिंगल टवाळी केली. लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय झाली. हे रिपोर्ट कार्ड म्हणजे आमच्या महायुती सरकारचा लेखा-जोखा असल्याचेही पवार म्हणाले . यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारने आजपर्यंत केलेल्या कामांचा पाढाच वाचला यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात परिवर्तनशील योजना महाराष्ट्रात आणल्या गेल्या
– शेतकऱ्यांना वीज देण्यासाठी स्वतंत्र कंपनी तयार करणारे महाराष्ट्र एकमेव राज्य
– महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ३६५ दिवस वीज मिळणार आहे याचं काम सुरू आहे
– साडेआठ रुपये दराने मिळणारी वीज तीन रुपये दराने मिळणार आहे
– वीजबिल माफीचा निर्णय विचार करूनच घेण्यात आला आहे

– मविआ काळात एकाही प्रकल्पाला सुधारित मान्यता मिळाली नव्हती
– आम्ही १४५ प्रकल्पांना सुधारित मान्यता दिल्याने २२ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे
– वैनगंगा, नळगंगा, नदीजोड प्रकल्प मंजूर करून ५५ टीएमसी पाण्याचा प्रश्न निकाली काढून मराठवाड्याचा पाणी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे
– सिंचन क्षेत्रात भरपूर काम केलंय
– होमगार्डच्या वेतनात भरघोस वाढ करून दिली
– वेगवेगळ्या समाजासाठी महामंडळे तयार करून न्याय देण्याचा प्रयत्न
– उद्धव ठाकरेंनी म्हटलंय की आम्ही महायुतीच्या सगळ्या योजना बंद करू, स्थगिती सरकार आणून महाराष्ट्राला कुलूपबंद करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही
अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून १ लाख तरुणांना उद्योजक बनविले
– पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठीही महामंडळ त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडीवर जहरी टीका केली यादरम्यान ते म्हणाले ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला त्यांनी आम्हाला कायदा शिकवू नये, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले लाडकी बहीण योजनेला कुणी टच करायला गेला तर त्याचा करेक्ट कार्यक्रम होणार, कॉमन मॅन हाच सुपर मॅन झाला पाहिजे .आतापर्यंत 2 कोटी 30 लाख महिलांच्या खात्यावर पैसे टाकले, रिपोर्ट कार्ड सादर करायला देखील हिंमत लागते असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले .

Loading

Previous Post

बनावट व्हिडीओत पोलीस आयुक्तांच्या नावाचा वापर

Next Post

“मध्य” मतदारसंघ कॉग्रेसला सुटणार का ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White