इंदिरानगर बोगदा नऊ महिन्यांसाठी राहणार बंद !

नाशिक : शहरातील इंदिरानगर बोगदा हा सोमवार पासून म्हणजेच 27 ऑक्टोबर 2025 पासून तर 27 जुलै 2026 पर्यंत बंद राहणार आहे. याला कारण म्हणजे मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील इंदिरानगर जंक्शन येथे न्हाई कडून समांतर बोगदा उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर जुन्या बोगद्याची लांबी दोन्ही बाजूंनी वाढविली जाणार आहे.मुंबई-आग्रा महामार्गावर इंदिरानगर बोगद्यावर गोविंदनगर-इंदिरानगर अशा दोन्ही बाजूने ग्रेड सेपरेट फ्लाओव्हर बांधण्यात येणार आहे. जुना बोगदा 8 मीटर दोन्ही बाजूंनी लांब करणार.नवीन बोगदा 24 मीटर लांबी व 15 मीटर रुंद असेल. यामुळे बोगद्याखालून जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी याचा वापर करावा….. साईनाथनगरकडून जाणारी वाहतूक बोगद्याच्या प्रारंभी डावीकडून वळण घेत सर्व्हिसरोडने लेखानगरकडे रवाना होणार. गोविंदनगरकडून येणारी वाहतूक बोगद्याच्या प्रारंभी डावीकडे वळण घेत सरळ मुंबईनाक्याच्या दिशेने रवाना होईल. या मार्गावरून प्रवेश नाही…… बोगद्यातून गोविंदनगरच्या दिशेने, मुंबईनाक्याकडून लेखानगरच्या दिशेने समांतर रस्त्यावरून वाहनांना नो एन्ट्री, इंदिरानगर सर्व्हिसरोडने मुंबईनाक्याच्या दिशेने येण्यास वाहनचालकांना नो एन्ट्री असणार आहे.

![]()












