भाईगिरी स्टाइल रिल बनवणाऱ्या तरूणींना पोलिसांनी घडवली अद्दल

नाशिक: शहरात वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस दलाने रौद्र रूप धारण केले असतानाच काही तरुण भाईगिरीचे रिल्स बनवत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी कठोर पाऊले उचलत त्यांच्यावर कारवाई केली मात्र भाईगिरीच्या रिल्स बनवण्यात तरुणांबरोबर आता तरुणीही दिसू लागल्याने सामान्य नागरिकांना आश्चर्याचा धक्काच बसला. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये भाईगिरी स्टाईल रिल बनवणाऱ्या दोन तरूणींना, देवळाली कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेत, चांगलाच धडा शिकविला. ज्या रिल्समध्ये या तरूणी ‘’हे नाशिक आहे भावा, इथं जर तू इज्जत दिली तर इज्जत भेटन, नाहीतर तुझी डेडबॉडी डायरेक्ट सिव्हिलला भेटन. हॅशटॅग नाशिककर, समझनेवालोको इशारा काफी है. नाद नाही करायचा, ताणून मारते ताणून.’’ असं म्हणताना दिसत आहेत.त्यानंतर या दोन तरुणींनी तयार केलेला धमकीवजा रील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या दोघींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतलं ही रील पंचवटी परिसरातील रामकुंड येथे बनवण्यात आली होती. मग जेव्हा पोलिसांकडून पोलिसी खाक्या दाखवला गेला, त्याचबरोबर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असून अशा प्रकारे समाजात भीती निर्माण करणारे किंवा गुन्हेगारी वर्तनाचे प्रदर्शन करणारे रील्स तयार करणे कायद्याने गुन्हा असल्याचे स्पष्ट केले त्यानंतर मग पुन्हा या दोन मुलींनी पोलिसांसमोर उभे राहत हात जोडून आपल्या कडून झालेल्या कृत्याची माफी मागितली. त्याचबरोबर कुणीही अशाप्रकारचा व्हिडिओ बनवू नका. नाशिक जिल्हा… कायद्याचा बालेकिल्ला.” असेही त्यांच्याकडून वदवुन घेण्यात आले.महिला असो की पुरुष कायद्याचे उल्लंघन सहन केले जाणार नाही हेच पोलिसांनी कारवाई करत दाखवुन दिले.

![]()












