• Latest
  • Trending
प्रभाग क्रमांक 23 भाजपच्या बालेकिल्ल्यात आता ठाकरे गटाची लढाई

प्रभाग क्रमांक 23 भाजपच्या बालेकिल्ल्यात आता ठाकरे गटाची लढाई

January 13, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Saturday, October 17, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

प्रभाग क्रमांक 23 भाजपच्या बालेकिल्ल्यात आता ठाकरे गटाची लढाई

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

नाशिक : इंदिरानगर चा विस्तृत अर्धा परिसर कमोद नगर, सुचिता नगर, दिपाली नगर, विनयनगर, साईनाथ नगर, श्रीराम नगर, भारत नगर, शिवाजीवाडी, पखालरोड व डीजीपी नगर एक असा मोठा भूभाग समाविष्ट असलेल्या प्रभाग क्रमांक 23 हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मागील पंचवार्षिक निवडणुकीत या प्रभागातून भाजपचे माजी महापौर सतीश कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, रूपाली निकुळे, आणि शाईन मिर्झा हे चार नगरसेवक निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत भाजपने दोन माजी नगरसेवकांना पुन्हा संधी दिली असून माजी नगरसेविका शाईन मिर्झा यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या जागी मंगला नन्नावरे यांना संधी देण्यात आली आहे. तर भाजपचे माजी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या जागी त्यांच्या कन्या असलेल्या संध्या कुलकर्णी या उमेदवारी लढवत आहेत. या प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व हातावर काम करणाऱ्या नागरिकांचे मतदान हे निर्णायक ठरणार आहे. या प्रभागात भाजप आणि ठाकरेंची शिवसेना या दोन्ही पक्षांचा मतदारांवर ठसा कायम राहिलेला आहे. मात्र आता शिंदे गटाची शिवसेना देखील या स्पर्धेत उतरली आहे. प्रभागातील एका जागेसाठी भाजपच्या माजी नगरसेविका रूपाली यशवंत निकुळे यांची थेट लढत ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वर्षा चंद्रकांत बोंबले आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शारदा चव्हाण यांच्याशी होणार आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या अश्विनी आमले ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या निर्मला थेटे भाजपच्या मंगला नन्नावरे आणि एम आय एम पक्षाच्या परविन शेख यांच्यात लढत रंगणार आहे. त्याचबरोबर भाजपचे माजी महापौर सतीश कुलकर्णी सलग पाच पंचवार्षिक निवडून आल्याने त्यांच्या जनसंपर्काचा लाभ त्यांच्या कन्या संध्या कुलकर्णी यांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सरप्रीत सिंग बल आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे अन्सार सय्यद हे रिंगणात आहेत. त्याचबरोबर भाजपचे माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे यांनी प्रभागात केलेले सिटी गार्डन, जॉगिंग ट्रॅक, त्याचबरोबर इतर केलेली विकास कामे ही त्यांची जमेची बाजू मानली जात असून त्यांची लढत ठाकरे गटाच्या शिवसेनेचे प्रवीण जाधव आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे योगेश म्हस्के आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्वागता उपासनी यांच्याशी होणार आहे. या प्रभागाची लोकसंख्या एकूण 49,655 इतकी असून यामध्ये पुरुष लोकसंख्या 24,944 तर स्री लोकसंख्या 24,701 इतकी आहे. या प्रभागात भाजपचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असून यंदाच्या निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला भेदण्यासाठी ठाकरे गटाची शिवसेना, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. म्हणजेच या ठिकाणी बहुरंगी लढत होणार असून याकडे राजकीय क्षेत्रातील तज्ञांचे लक्ष लागून आहे

Loading

Previous Post

नाशकात अनेक ठिकाणी दोन मित्रांमध्येच कुस्ती

Next Post

नाशिकमध्ये महापौर पदासाठी जोरदार लॉबिंग सुरू, बडे नेते महाजनांच्या भेटीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White