पोलीस दलाला कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाईचे आदेश

नाशिक : शहरात एकीकडे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे कायदा मोडणाऱ्या पोलिसांवर देखील कारवाई करत असल्याचे चित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी जुने नाशिक परिसरातील एका गल्ली भाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठयाप्रमाणात व्हायरल झाला होता. यामध्ये एका गल्लीत एका वृद्ध महिलेसमोर एका तरुणाला धमकावत “में 112 को भी नही डरता,किसके भी पास जा. या सारख्या धमक्या तो तरुणाला देत होता. त्यानंतर भद्रकाली पोलीस ठाण्यातील अंमलदाराने त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली त्यांच्या या कारवाईचे स्वागत देखील करण्यात आले. मात्र त्याच्यावर कारवाई करताना त्याचा व्हिडीओ शूट करणारी संबंधीत पोलिसाची कृती नियमबाह्य ठरली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत त्या रील स्टार पोलीस अंमलदाराची खातेतर्गत चौकशीचे आदेश देत त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली. गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई अवश्य करा मात्र कारवाई करताना कायदा हातात घेऊ नये, यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होईल असे कृत्य करू नका,पोलीस दलाला कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करण्याचे आदेश व सूचक इशाराच पोलीस आयुक्त कर्णिक यांनी दिला.

![]()












