• Latest
  • Trending

उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे होणार तीव्र संघर्ष….

May 9, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे होणार तीव्र संघर्ष….

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

नाशिक लोकसभा ठाकरे गट व शिंदे गटासाठी प्रतिष्ठेची

नाशिक :राज्यातील चौथ्या टप्प्याचे मतदान 13 मे ला संपल्यानंतर पाचव्या टप्प्यातील मुंबई, नासिक, ठाणे, सारख्या हॉट जागांवर लोकसभेसाठी मतदान होणार आहे.मुख्य म्हणजे हा टप्पा उबाठा नेते उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी परीक्षाच ठरणार आहे. शिंदे यांच्या वाट्याला आलेल्या 15 पैकी 9 जागांची निवडणूक या दोन टप्यांमध्ये होणार आहे . त्यात ठाणे आणि कल्याण हे मतदारसंघ आहेतच त्याबरोबर नाशिक का किंग कोण ? ठाकरे की शिंदे याचा फैसला यानिमित्ताने होणार आहे. त्यामुळे तीन टप्प्यातील मतदान संपल्यानंतर आता सर्वच पक्षांच्या नजरा नाशिककडे केंद्रित झाल्या आहेत. सुरुवातीच्या काळात नाशिक लोकसभेत बऱ्याच घडामोडी घडल्या यामुळे नाशिक महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आले .केंद्राने उमेदवारीसाठी छगन भुजबळ यांचे नाव घेतल्यानंतर सुद्धा भुजबळांना माघार घ्यावी लागली, तर दुसरीकडे सुरवातीला आक्रमक असणारी भाजपा नंतर शांत झाली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाशिक लोकसभेची जागा स्वताच्या पक्षाकडे ठेवण्यात यश आले. त्याचबरोबर विरोध असताना सुद्धा हेमंत गोडसे यांना उमेदवारी देऊन आमच्या पक्षात असलेल्या कार्यकर्त्याना व नेत्यांना न्याय मिळतोच हेच मुख्यमंत्री शिंदे यांनी दाखवून दिले. त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघ हा त्यांच्या प्रतिष्ठेचा विषय झाल्यामुळेच त्यांनी नाशिक दौऱ्यावर येत पक्ष-पदाधिकाऱ्यांबरोबर निवडणुकीची रणनीती ठरवली. त्यांच्या या दौऱ्यामुळे महायुतीतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांना एकप्रकारे बूस्टर डोस मिळाला. पक्षाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे म्हणाले प्रचाराला कमी वेळ मिळत असल्याने घाबरू नका कमी चेंडूत जास्त रण काढण्याची आम्हाला सवय आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे यांनी भेटीगाठीवर देखील भर दिला .ते म्हणाले शांतीगिरी महाराज यांच्या मनधरणीसाठी मी स्वता दोनदा फोन केला मात्र त्यांनी ऐकले नाही. यावेळी काही आखाड्याचे साधू,महंत, वारकरी संप्रदायाचे गुरू, शिष्य यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी कुंभमेळा तयारीबाबत साधूमहंत यांच्याशी चर्चा झाली असून निधी कमी पडणार नसल्याचे देखील शिंदे म्हणाले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपा व मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. मुख्य म्हणजे विजय करंजकर व अजय बोरस्ते यांना उपनेते पद दिले म्हणजेच मूळ नेतृत्वाला न दुखवता बढती देत दुसरीकडे मातोश्री वरून आलेल्याना लगेच संधी देत दुहेरी खेळी खेळली .कालच्या मेळाव्यात पालकमंत्री दादा भुसे म्हणाले होते मुख्यमंत्री साहेबांचे सलीम कुत्ता वर लक्ष नाही लक्ष गेल्यास ….असा इशारा काल पालकमंत्र्यांनी दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिक सोडताच सलीम कुत्ता प्रकरणात ठाकरे गटाचे जिल्हाअध्यक्ष सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली. तर येत्या 15 तारखेला नाशिक व दिंडोरी मतदारसंघातील महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी पिंपळगाव बसवंत येथील कांदा -मार्केटच्या मैदानावर सभा होणार असून त्याचदिवशी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानात होणार आहे तर पश्चिम मतदारसंघात आदित्य ठाकरे यांची रॅली होणार आहे. यादरम्यान महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली . यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा आहे. त्याचप्रमाणे भाजपासाठी देखील तितकाच महत्वाचा आहे यामध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा होणार का ? याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे

Loading

Previous Post

नाशिकमध्ये खुनाची मालिका सुरूच, धारदार शस्त्राने तरुणावर हल्ला ……

Next Post

खुनातील हल्लेखोर चोवीस तासात उपनगर पोलिसांनी केले गजाआड……

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White