मध्यरात्री टोळक्याने केले होते तरुणावर धारदार शस्त्राने वार

नाशिक :जुन्या वादाची कुरापत काढत रोकडोबा वाडी मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास टोळक्याने एका युवकावर धारदार शस्त्राने वार करून ठार मारल्याची घटना घडली होती. गंभीररित्या जखमी झाल्याने आरमान मुन्नावर शेख (रा देवळाली गाव) याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी उपनगर पोलिसांनी सकाळी हल्लेखोरांपैकी संशयित रवी राठोड, झिंग्या उर्फ संदेश महाकाली, आकाश दिनकर, या तिघांना ताब्यात घेतले होते. तर उर्वरित चौघा संशयितांचा शोध सुरू होता. मात्र आज पोलिसांनी त्यांचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. रोकडोबा वाडी मध्ये मध्यरात्री अरमान शेख हा त्याच्या दुचाकीने रोकडोबावाडी परिसरात आला. यावेळी घराबाहेर उभ्या असलेल्या हितेश खलसे याला गाडीत पेट्रोल भरून येऊ असे सांगून आरमान त्याला दुचाकी वर बसून जय भवानी रोड कडे गेला. मात्र पेट्रोल पंप बंद असल्याने पुन्हा त्याच मार्गे अरमान व हितेश घरी परतत होते. यावेळी रोकडोबावाडीच्या गतिरोधकावर अरमान याने दुचाकी हळू केली. यादरम्यान चंप्या उर्फ आकाश दिनकर यांनी अरमानला गाडी थांबविण्यास सांगितले. यावेळी चंप्यासोबत रवी राठोड, झिंग्या उर्फ संदेश महाकाली हे दोघे तेथे आले. पाठीमागून दु-चाकीने आकाश तपासे टक्या उर्फ प्रेम व त्यांचे दोन साथीदार सुद्धा आले जुन्या वादाची कुरापत काढत धमकावून आकाश तपासे यांने आरमान शेख वर धारदार शस्त्राने वार करण्यास सुरुवात केली. यावेळी शिवीगाळ,मारहाण करत आरमान याच्यावर टोळक्यातील अन्य हल्लेखोरांनी हत्याराने सपासप त्याच्या पाठीवर वार करतात हितेश खलसे याने पळ काढत घराजवळ आडोशाला जाऊन लपला. मात्र अरमान हा तिथेच रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याचे बघून हल्लेखोरांनी पळ काढला होता. यावेळी पोलिसांनी सकाळी हल्लेखोरांपैकी संशयित रवी राठोड, झिंग्या उर्फ संदेश महाकाली, आकाश दिनकर या तिघांना ताब्यात घेतले होते मात्र उर्वरित चौघे संशयित फरार झाले होते. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित आकाश कश्यप तपासे, (रा मालधक्का रोड) प्रेम संतोष डेंगळे उर्फ टाक्या (रा गुलाबवाडी) सुमित बाळू जाधव उर्फ चिंक्या (रा विहितगाव) हे लहवीत शिवरात लपून बसले असता पोलिसांनी त्यांना लागलीच अटक करत गजाआड केले . आरोपींना 24 तासाच्या आत अटक केल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी उपनगर पोलिसांचे अभिनंदन केले असून, ही कामगिरी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रणजीत नलावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, पोलीस उपनिरीक्षक मंगेश गोळे, शशिकांत पवार, विशाल सपकाळे, सुरेश गवळी, विनोद लखन, इमरान शेख, गोविंद भांबरे, सौरभ लोंढे, पंकज करपे, जयंत शिंदे, गौरव गवळी, संजय रगतवार, मिलिंद बागुल, मुकेश क्षीरसागर, सुनील गायकवाड, आदींनी केली.

![]()











