• Latest
  • Trending

आमदार बनायचं मग आधी नगरसेवक बना !

November 6, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

आमदार बनायचं मग आधी नगरसेवक बना !

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

आमदारकीची उमेदवारी मिळवणारे बहुतांश माजी नगरसेवकच

नाशिक : विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आणि महायुती असो की महाविकास आघाडी या सर्वांनी आप-आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले यामध्ये अर्थात नगरसेवक म्हणून काम केलेल्या लोकप्रतिनिधीचा भरणा जास्त आहे.

नाशिक मध्य मतदारसंघातुन ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झालेले वसंतराव गिते हे नाशिक महापालिकेचे महापौर होते. त्याचबरोबर 2009 मध्ये ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार होते. मध्य मतदारसंघातुन भाजपच्या उमेदवार देवयानी फरांदे या देखील नगरसेविका आणि उपमहापौर होत्या.गेल्या दोन निवडणुकांमध्ये त्या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.

भाजपकडून पूर्व मतदारसंघात उमेदवारी करणारे विद्यमान आमदार राहुल ढिकले हे नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक असून 2012 मध्ये ते मनसेच्या वतीने स्थायी समिती सभापती पदावर देखील विराजमान झाले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे पूर्व मतदारसंघातील उमेदवार गणेश गिते हे आधी भाजपचे माजी नगरसेवक व स्थायी समिती सभापती होते

नाशिक पश्चिम मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार सीमा हिरे या माजी नगरसेविका असून त्यांचे प्रतिस्पर्धी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार सुधाकर बडगुजर हे देखील माजी नगरसेवक व सभागृह नेता होते तर याच मतदारसंघातून नशीब आजमावणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिनकर पाटील हे देखील माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे विधानसभेसाठी आता नगरसेवकांमध्येच लढत होत असल्याचे चित्र आहे.त्यामुळेच जर कोणाला आमदार होण्याची इच्छा असेल तर त्यांना आधी महापालिकेचे दरवाजे ठोठावत नगरसेवक बनावे लागेल हे निश्चित

Loading

Previous Post

माघारीनंतर उमेदवारांचा प्रचार सुरू

Next Post

नाशकात माजी आमदाराकडे 5 लाखांची मागितली खंडणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White