नाशिक पोलिसांची दमदार कामगिरी

नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरात नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा आवाज घुमत असताना हाच आवाज आता नेपाळ बॉर्डरवर देखील घुमल्याने नाशिक पोलिसांच्या चमकदार कामगिरीची चर्चा आता महाराष्ट्राबाहेर देखील होऊ लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिकचा सराईत गुन्हेगार भूषण प्रकाश लोंढे व त्याचा साथीदार प्रिन्स हे नाशिक पोलिसांना मागील दोन महिन्यांपासून गुंगारा देत उत्तर प्रदेश, राज्यस्थान या दोन राज्यात लपून होते. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यातील एका खेडेगावापर्यंत गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने माग काढत लोंढे टोळीतील फरार भूषण लोंढे, प्रिन्स यांच्या जवळचे मानले जाणारे सराईत गुन्हेगार वेदांत चाळगे, राहुल गायकवाड या दोघांना बेड्या ठोकल्या होत्या. त्यावेळी भूषण लोंढे व प्रिन्स हे दोघे पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. भूषण व राहुल या दोघांनी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतल्यामुळे दोघांच्या पायांचे हाड मोडले होते. यादरम्यान राहुलवर दोन दिवस उपचार करून पोलिसांनी नाशिकला आणले होते. मात्र भूषण लोंढे हा उत्तर प्रदेशमधून प्रिन्सच्या मदतीने राजस्थानमध्ये पळून गेला होता. त्याच्याही दोन्ही पायांचे हाड तुटल्याची गुप्त माहिती पोलिसांना होती. त्यामुळे गुन्हे शाखा युनिट 2 चे पथक हे त्यांच्या मागावर होते. सुरवातीला गुजरात, हरयाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या पाच राज्यांमध्ये मागील दोन महिन्यांपासून भूषण व त्याचा साथीदार फिरत होते. या राज्यातील वेगवेगळ्या शहरांमधील गावात ते भाडेतत्त्वावर भेटेल त्या खोलीत राहत होते. भूषण, प्रिन्स हे दोघेही राजस्थान, उत्तरप्रदेशमध्ये फिरत असल्याची माहिती पोलिसांना होतीच त्याचबरोबर तांत्रिक विश्लेषणाद्वारे देखील पोलिसांनी खात्री करून घेतली. दोघेही सराईत गुन्हेगार असल्याने ते परराज्यात आश्रयाला असल्याने शिताफिने सापळा रचने गरजेचे होते. कारवाईदरम्यान छोटीशी चूक देखील महागात पडू शकत होती. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त किरण कुमार चव्हाण किरण काळे सहाय्यक आयुक्त संदीप मिटके गुन्हे शाखा युनिट एक चे प्रभारी सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे यांची बैठक घेत पथकाला बारकावे समजून दिले.यादरम्यान पोलिसांच्या पथकाने नाशिक मधून अगोदर राजस्थान गाठले येथील कोटपूतली जिल्ह्यात जाऊन दोघांचा शोध घेतला मात्र तेथून त्यांनी पलायन केले असल्याची माहिती मिळाली पथकाने पुन्हा कौशल्याचा वापर करत त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता उत्तर प्रदेश मध्ये नेपाळच्या सीमेजवळच्या गावात दोघे राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानंतर पथकाने तेथील महाराज गंज मध्ये जाऊन तळ ठोकला यादरम्यान भूषण लोंढे यांच्या दोन्ही पायांची हाडे मोडल्यामुळे तो उत्तर प्रदेशच्या महाराजगंज कुल्लू ही गावातील एका रुग्णालय व सर्जिकल सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल झालेला होता त्याची देखभाल प्रिन्सिंग हा करत होता पोलिसांनी साधे आयुष्यात येथून त्याला ताब्यात घेतले त्यानंतर गावातील एका खोलीतून त्याचा साथीदाराला बेड्या ठोकण्यात आल्या. यावेळी त्याच ठिकाणी त्यांच्याकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला वदवून घेण्यात आले. गुन्हे शाखा युनिट 2 च्या कारवाई करणाऱ्या पथकात सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे यशवंत बेंडकोळी शंकर काळे प्रकाश महाजन सुनील आहेर अतुल पाटील महेश खांडबहाले तांत्रिक विश्लेषण शाखेतील सहाय्यक निरीक्षक जया तारडे या टीमने या कारवाईमध्ये सहभाग घेतला.

![]()















