शिंदे गटाच्या शिवसेनेत चार माजी नगरसेवक दाखल

नाशिक : महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू होण्यापूर्वीच महायुतीतील मित्र पक्ष असलेले भाजप आणि शिंदे गट यांच्यात मेघा भरती करण्यासाठी स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र आहे. एकीकडे भाजपात सुधाकर बडगुजर, मंत्री बबनराव घोलप, माजी महापौर अशोक मुतडक, माजी महापौर नयना घोलप,दिलीप दातीर हे प्रवेश करत असतानाच तिकडे शिंदे गटाच्या शिवसेनेदेखील चार माजी नगरसेवक गळाला लावत त्यांचा प्रवेश करून घेतला यामध्ये उद्धव गटाच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका किरण बाळा दराडे-गामने, सीमा निगळ, पुंजाराम गामने, पुंडलीक अरिंगळे यांचा समावेश आहे. या प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दादा भुसे, उपनेते अजय बोरस्ते, हेमंत गोडसे ,प्रवीण तिदमे उपस्थित होते. ठाकरे गटाच्या शिवसेनेला भाजपा, शिंदे गटाचा धक्का ? मुख्य म्हणजे काल भाजप मध्ये झालेल्या मेघा भरतीत ठाकरे गटाच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक दाखल झाले. तर शिंदे गटाच्या शिवसेनेने देखील ठाकरे गटाच्या शिवसेनेलाच धक्का देत चार नगरसेवकांचा प्रवेश सोहळा करून घेतला 2017 मध्ये झालेल्या नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपचे 66 नगरसेवक निवडून आले होते तर शिवसेनेचे 35 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर शिवसेनेत फूट पडून 35 पैकी 19 नगरसेवक शिंदे गटाच्या शिवसेनेत गेले. तर 4 नगरसेवकांनी भाजपात जाणे पसंत केले. त्यामुळे आताच्या घडीला ठाकरे गटाच्या शिवसेनेत अवघे 9 नगरसेवक राहिले असून महापालिका निवडणुका जवळ येता-येता अनेक माजी नगरसेवक पक्षांतर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

![]()















