• Latest
  • Trending
भाजप नेत्यांची भाषा 180 अंशांच्या कोनात बदलेली

भाजप नेत्यांची भाषा 180 अंशांच्या कोनात बदलेली

June 18, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Saturday, October 17, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

भाजप नेत्यांची भाषा 180 अंशांच्या कोनात बदलेली

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

बडगुजर यांच्यावरील एसआयटी चौकशीचे काय ?

नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या सुरू असताना काल मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र याच भाजपने विधासभा निवडणुकीआधी सुधाकर बडगुजर यांना आरोपांच्या पिंजऱ्यात उभे केले होते व राजकीय वातावरण तापवले होते. भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप राणे यांनी केला होता. या पार्टीचे फोटोही सभागृहात झळकावले होते. त्यावेळी नितेश राणे म्हणाले होते.सुधाकर बडगुजर 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत काय करत होते? याची चौकशी करण्याची मागणी राणे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.त्यावर मंत्री दादा भुसे आणि भाजप आमदार आशिष शेलार यांनीही विधिमंडळात राणेंची पाठराखण करत राणेंच्या उपस्थित प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की

बॉम्ब स्फोटातल्या आरोपीसोबत पार्टी करण्याचा विषय अतिशय गंभीर आहे. देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा जवळचा सहकारी सलीम कुत्ता हा खरे तर पॅरोलवर बाहेर होता. त्यामुळे त्याला पार्टी देखील करता येत नाही. त्यामुळे त्याने पार्टी करायची आणि कोणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचे हा गंभीर प्रकार आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता सोबत या संबंधीत व्यक्तीचा काय संबंध आहे, अशी पार्टी करण्यात कोण-कोण होते, त्याला कोणाचा वरदहस्त होता का ? हे तपासण्यात येईल. बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत कोणी पार्टी करत असेल तर त्याचा अर्थ संवेदना मेल्यात असा होतो. म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की एसआयटीच्या माध्यमातून ठरवून दिलेल्या वेळेत या प्रकरणाची तपासणी होईल. तसचे दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिले होते. मात्र आता आमदार नितेश राणे यांच्याबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील सूर बदलल्याचे चित्र आहे.आता नितेश राणे म्हणतात हिंदुत्त्वाचा धागा पकडून आमच्यासोबत कोणीही येत असेल तर आम्ही त्याचे स्वागतच करणार. बडगुजर आता 100 टक्के भगवाधारी झाले आहेत. त्यामुळे ते आमच्यासोबत येणार असतील त्यांचे स्वागतच आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस बडगुजर यांच्या भाजप प्रवेशानंतर म्हणतात बडगुजर यांच्यावर टीका करण्यात आली होती, ही गोष्ट खरीच आहे. त्यांचा एक व्हिडीओ देखील नितेश राणेंनी रिलीज केला होता. पण त्यानंतर त्यांच्यावर जो गुन्हा दाखल झाला, त्याची पूर्ण चौकशी झाल्यानंतर त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. हे सगळं बडगुजर त्या पक्षात (ठाकरे गटाच्या शिवसेनेत) असताना झालेलं आहे. आमच्याकडे आल्यावर तसं घडलेलं नाही.काही दिवसांपूर्वी सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात आकांडतांडव करणारे मात्र आज शांतपणे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना दिसले. त्यामुळे भाजपच्या वॉशिंग मशीन’ चे लाभार्थी झाले की सर्वच पावन होतात अशी चर्चा सामान्य नागरिकांपासून तर राजकीय निरीक्षकांपर्यंत सुरू आहे

Loading

Previous Post

‘मेघा भरती’साठी भाजप,शिंदे गटात स्पर्धा

Next Post

त्या हत्याकांडाबाबत 1400 पानांचे दोषारोपपत्र सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White