• Latest
  • Trending
99.84 टक्के मतदानाने रंगली विधान परिषद निवडणूक,आता उत्सुकता निकालाची

99.84 टक्के मतदानाने रंगली विधान परिषद निवडणूक,आता उत्सुकता निकालाची

June 18, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

99.84 टक्के मतदानाने रंगली विधान परिषद निवडणूक,आता उत्सुकता निकालाची

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

येत्या सोमवारी २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे

नाशिक : एकीकडे राज्यात शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार फुटीवरून गदारोळ झाल्याचे चित्र दिसत असतानाच दुसरीकडे राज्यभरात विधानपरिषद निवडणुकीचे मतदान पार पडले. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज (गुरुवार) सकाळी ८ वाजेपासून मतदानास सुरवात झाली. जिल्ह्यात नऊ ठिकाणी मतदान केंद्र निश्चित करण्यात आले होते. या सर्व मतदान केंद्रांवर सकाळच्या सुमारास मतदारांचा शांत प्रतिसाद बघायला मिळाला. मात्र, दुपारनंतर मतदार केंद्रांवर जाऊन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे सायंकाळी चार वाजेपर्यंत नाशिक विधान परिषदेसाठी ९९.८४ टक्के इतके मतदान झाले होते. नाशिक विधानपरिषदेच्या एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ मतदारांनी जिल्ह्यातील विविध केंद्रांवर जाऊन मतदान केले. यात ३१९ महिला नगरसेविका आणि २९९ पुरुष नगरसेवकांचा समावेश आहे. तर मालेगाव महापालिकेतील एका नगरसेवकाने मतदानाचा हक्क बजावला नसल्याने एकूण ६१८ मतदारांनी मतदान केले. जिल्ह्यातील आठ मतदान केंद्रांवर १०० टक्के मतदान झाले असून, एका मतदान केंद्रावर ९८.८१ टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाच्या शिवसेनेने (महाविकास आघाडीने) अधिकृत उमेदवार उभा न केल्यामुळे ही लढत महायुती आणि बंडखोरांभोवती फिरत राहिल्याचे चित्र आहे. निवडणुकीच्या रिंगणात महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शिंदे गटाच्या शिवसेनेचे नरेंद्र दराडे हे होते. मात्र भाजपचे माजी नगरसेवक गणेश गिते यांचे बंधू गोकुळ गिते यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने स्पर्धा निर्माण झाली होती. महायुतीच्या नेत्यांनी गिते यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मतदानाच्या आठ दिवस आधी आपला प्रचार थांबवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी दराडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. दरम्यान, गिते आणि हिरे यांनी कायदेशीर मुदतीनंतर थांबण्याचा निर्णय घेतल्याने मतपत्रिकेवर दोघांचीही नावे कायम होती. यामुळे पसंतीक्रमाची मते फुटण्याची धास्ती महायुतीला असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता सोमवार (दि.२२) रोजी लागणार्‍या निकालावेळीच कोणाची किती मते फुटली हे स्पष्ट होईल. या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे महायुती जवळ पुरेसे संख्याबळ असताना देखील आपल्या सर्व नगरसेवकांना त्यांनी ठाणे आणि भिवंडी येथील हॉटेल्स वर ठेवले होते.

Loading

Previous Post

सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह,हत्या करून मृतदेह फेकल्याचा संशय

Next Post

ठाकरेंच्या निष्ठावंत शिलेदाराचे नाशकात पाऊल ठेवताच जंगी स्वागत 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White