• Latest
  • Trending
18 दिवसात करा इंदिरानगर  अतिक्रमणमुक्त

18 दिवसात करा इंदिरानगर अतिक्रमणमुक्त

March 4, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Saturday, October 17, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

18 दिवसात करा इंदिरानगर अतिक्रमणमुक्त

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

आमदार देवयानी फरांदे यांची बैठकित पोलीस मनपा अधिकाऱ्यांना तंबी

नाशिक : इंदिरानगर परिसरातील वाढते अतिक्रमण ही नागरिकांची डोकेदुखी ठरत असून त्याचबरोबर इंदिरानगर, शिवाजीवाडी,भाभानगर या परिसरात असलेल्या लॉन्समुळे वाहतुकीला होणारी अडचण व वाढती गुन्हेगारी यासंदर्भात मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी मनपा अधिकारी व पोलीस प्रशासन यांची बैठक घेत पुढच्या 18 दिवसात कारवाई करण्याची तंबी दिली. वडाळा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या सायकल ट्रॅक वर मुले -मुली अश्लील चाळे करत असून त्याचबरोबर याठिकाणी नशेखोरांचा सुळसुळाट झाला आहे तरुण मुले एमडी ड्रग्ज, गांजा आदींचे सेवन करत असल्याच्या तक्रारी आमदार देवयानी फरांदे यांना प्राप्त झाल्या होत्या. त्याचबरोबर अशोका हॉस्पिटलच्या रस्त्यावर दुतर्फा दुचाकी व चारचाकी लावल्या जात असल्यामुळे अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे. तर वडाळा गाव व वडाळा रस्त्यांवरील जनावरांचे गोठे स्थलांतरित करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. प्रभाग क्रमांक 23 व 30 मध्ये अनधिकृत लॉन्स धारकांनवर कारवाईची देखील मागणी करण्यात आली ही बैठक आमदार देवयानी फरांदे यांच्या अध्यक्षतेखाली अशोका रुग्णालयाच्या हॉलमध्ये घेण्यात आली. या बैठकीला माजी महापौर सतीश कुलकर्णी, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, चंद्रकांत खांडवी, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मयूर पाटील,माजी नगरसेवक यशवंतराव निकुळे, चंद्रकांत खोडे, सुनील खोडे,सुप्रिया खोडे अँड अजिंक्य साने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे, जितेंद्र सपकाळ, दिवाण सिंग, देविदास वांजळे, सहायक पोलिस निरीक्षक सुनील अनकोलीकर यांच्यासह  व महापालिका अधिकारी, पोलिस,माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. महापालिका आयुक्तांना निवेदन प्रभाग क्रमांक 23 मधील अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना माजी नगरसेवक व प्रभागातील नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात परिसरातील लॉन्सचे वाढते अतिक्रमण त्याचबरोबर साईनाथ चौक सिग्नल, अशोका मार्ग, विनयनगर या परिसरात वाढत्या टपऱ्या,पत्र्याचे शेड काढण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Loading

Previous Post

तलवारी फिरवत भाईगिरी मग पोलिसांकडून वरात

Next Post

इंदिरानगरमध्ये आगीत फर्निचर दुकानासह गॅरेज खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White