• Latest
  • Trending
1 एप्रिलपासून बदलणार बँकांचे नियम

1 एप्रिलपासून बदलणार बँकांचे नियम

March 26, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

1 एप्रिलपासून बदलणार बँकांचे नियम

YOU MAY ALSO LIKE

नाशिकच्या पुराचा मापदंड, दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला

टाटांचा शेअर उच्चांकी किंमतीवर

क्रेडिट कार्डवरील भत्ते, एटीएममधून पैसे काढणे आणि बचत खात्यातील नियमांवर होणार परिणाम

नाशिक : 2025-26 हे नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यास काही दिवस शिल्लक आहेत. नवीन आर्थिक वर्ष मंगळवार 1 एप्रिलपासून सुरू होईल. नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होताच देशातील कोट्यवधी सामान्य लोकांसाठी अनेक आर्थिक नियम देखील बदलणार आहेत. 1 एप्रिल 2025 पासून नवीन आर्थिक वर्षापासून बँकांशी संबंधित नवीन नियम लागू होणार आहेत. या बदलांचा परिणाम थेट सर्वसामान्यांवर होणार आहेत. एटीएममधून पैसे काढणे, बँक खात्यात किमान शिल्लक रक्कम, डिजिटल बँकिंग, बचत खाते आणि मुदत ठेवीवरील व्याजदरात बदल होणार आहेत. तसेच क्रेडिट कार्ड सेवांच्या नियमांत देखील बदल होणार आहे. एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमांत बदल…पूर्वी अनेक बँका 5 वेळा मोफत पैसे काढण्याची सुविधा देत होत्या. आता नवीन नियमांनुसार ही संख्या कमी करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून बँक ग्राहकांना दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून फक्त तीन वेळा मोफत पैसे काढण्याची सुविधा मिळेल. यापुढील प्रत्येक अतिरिक्त व्यवहारावर 20 ते 25 रुपये शुल्क आकारले जाईल मिनिमम बॅलेन्स नियमांत बदल…..स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि कॅनरा बँक यासह अनेक मोठ्या बँकांनी किमान शिल्लक ठेवण्याच्या नवीन अटी लागू केल्या आहेत. आता ग्राहकांना शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागानुसार वेगवेगळे मिनिम बॅलेन्स ठेवावे लागेल. निश्चित रक्कम खात्यात शिल्लक ठेवण्यात अयशस्वी झाल्यास दंड आकारला जाईल. या दंडाची रक्कम बँक आणि खात्याच्या प्रकारानुसार बदलू शकते. UPI च्या नियमांमध्ये मोठा बदल…
देशातील वाढत्या आर्थिक फसवणुकीला आळा घालण्यासाठी NPCI 1 एप्रिल 2025 पासून UPI च्या नियमांमध्ये मोठा बदल करणार आहे. तुम्ही ज्या बँक खात्याद्वारे UPI वापरत आहात त्या खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर बराच काळ निष्क्रिय असल्यास तो UPI आयडी 1 एप्रिलपासून बंद केला जाईल. त्या नंबरवरून तुम्हाला UPI व्यवहार करता येणार नाही. डिव्हिडेड मिळणार नाही…
तुम्ही अद्याप पॅन आणि आधार लिंक केले नसेल तर तुम्हाला 1 एप्रिल 2025 पासून लाभांश (Dividend) मिळणे बंद होईल. यासोबतच लाभांश आणि भांडवली नफ्यातून मिळणारा टीडीएस कपात देखील वाढेल. एवढेच नाही तर तुम्हाला फॉर्म 26 एएस मध्ये कोणतेही क्रेडिट मिळणार नाही. कर प्रणालीत बदल….
तुम्ही नवीन कर प्रणाली स्विकारली असेल आणि आता जुन्या कर प्रणालीकडे जाऊ इच्छित असाल तर तुम्ही हे बदल करू शकता. तुम्ही कर भरताना जुनी कर व्यवस्था निवडली नाही तर तुम्हाला आपोआप नवीन कर प्रणालीमध्ये समाविष्ट केले जाईल. म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यांसाठी कडक नियम…
1 एप्रिल 2025 पासून म्युच्युअल फंड आणि डीमॅट खात्यांसाठी केवायसी नियम अधिक कडक होणार आहेत. सेबीने बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी बनवलेले नवीन नियम लागू होणार आहेत. नवीन नियमांनुसार सर्व वापरकर्त्यांना त्यांचे केवायसी आणि तयार केलेल्या नॉमिनीच्या सर्व तपशीलांची पुन्हा पडताळणी करावी लागेल. तुम्ही हे केले नाही तर तुमचे खाते गोठवले जाऊ शकते. डिजिटल बँकिंगचे नवीन फिचर्स….
डिजिटल बँकिंग अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्यासाठी बँका आता नवीन ऑनलाइन सेवा आणि एआय-चालित चॅटबॉट्स सुरू करत आहेत. याशिवाय डिजिटल व्यवहार सुरक्षित करण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेन्टिकेशन आणि बायोमेट्रिक व्हेरिफिकेसन कडक केले जाणार आहे. पॉझिटिव्ह पे सिस्टीम (पीपीएस) लागू…
बँक फसवणूक रोखण्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम (PPS) लागू केली जात आहे. आता 5000 रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या चेक पेमेंटसाठी ग्राहकांना चेक नंबर, तारीख, लाभार्थीचे नाव आणि रक्कम पडताळावी लागेल. या प्रक्रियेमुळे चुकीचे पेमेंट आणि फसवणूक रोखण्यास मदत होईल. क्रेडिट कार्डचे फायदे ….
एसबीआय आणि आयडीएफसी फर्स्ट बँक विस्तारा क्रेडिट कार्डचे फायदे बदलत आहेत. मोफत तिकीट व्हाउचर, नूतनीकरण फायदे आणि माइलस्टोन रिवॉर्ड्स यासारख्या सुविधा बंद केल्या जातील. 18 एप्रिल 2025 पासून अ‍ॅक्सिस बँक त्यांच्या विस्तारा क्रेडिट कार्डवरही असेच बदल लागू करेल. बचत खाते आणि एफडीच्या व्याजदरात बदल…
अनेक बँकांनी बचत खाती आणि मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरात बदल जाहीर केले आहेत. आता खात्यात जमा केलेल्या रकमेच्या आधारावर व्याजदर ठरवले जातील. यामुळे मोठ्या प्रमाणात रक्कम ठेवणाऱ्या ग्राहकांना अधिक व्याज मिळण्याची शक्यता आहे.

Loading

Previous Post

धक्कादायक, अखेर “त्या” कामगाराचा मृत्यू

Next Post

ही तर हद्दच झाली ! चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच उखडून नेलं 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White