• Latest
  • Trending
हेमलता पाटील यांचा “कॉग्रेसला” राम-राम ?

हेमलता पाटील यांचा “कॉग्रेसला” राम-राम ?

January 16, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

हेमलता पाटील यांचा “कॉग्रेसला” राम-राम ?

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

महापालिका निवडणुकांपूर्वीच नाशकात कॉग्रेसला मोठा धक्का

नाशिक: नाशकात विधानसभा निवडणुका संपल्यानंतर कॉग्रेस पक्षात गळती लागण्यास सुरवात झाली असून काही दिवसांपूर्वी कॉग्रेसचे निष्ठावंत नगरसेवक जॉय कांबळे यांनी कॉग्रेस पक्षाला राम-राम करत शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच पुन्हा एकदा नाशिक शहरात कॉग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून कॉग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या व प्रवक्त्या डॉ हेमलता पाटील या कॉग्रेस पक्ष सोडण्याच्या तयारीत असून तसे संकेत देखील त्यांनी फेसबुकवर पोस्ट करून दिले आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले आणि प्रत्यक्ष उमेदवारी मिळू लागली तेव्हा नकार दिला.पक्षाच्या अशा वाईट प्रसंगाच्या वेळी डॉक्टर हेमलता पाटील यांनी तत्कालीन भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्या विरोधात कुठलीही तयारी नसताना निवडणूक लढवली आणि सुमारे 73 हजार मते मिळवली होती.

यंदा लोकसभा निवडणुकीतील निकाल पहाता काँग्रेस पक्षाला आणि डॉक्टर हेमलता पाटील यांना ही अनुकूल वातावरण होते. त्याचबरोबर काही महिन्यांपासून डॉ. हेमलता पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. त्या संदर्भात त्यांनी मतदारसंघ देखील पालथा घातला होता. त्यांनाच उमेदवारी मिळेल आणि आमदार देवयानी फरांदे यांना यंदा ही निवडणूक अवघड जाईल अशी चर्चाच राजकीय क्षेत्रात सुरू होती. मात्र ऐनवेळी कुठलीही पूर्व कल्पना न देता मध्य मतदारसंघ हा ठाकरे गटाच्या शिवसेनेला सोडण्यात आला त्यामुळे हेमलता पाटील या नाराज होत्या. यादरम्यान पक्षश्रेष्ठी मात्र अद्याप जागा वाटप झालंच नसल्याचे सांगत होते. तर दुसरीकडे मात्र ठाकरे गटाच्या उमेदवाराला मुंबईत बोलावत “एबी” फार्म देण्यात आला होता. त्यामुळे कॉग्रेस कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले होते. त्यांनी कॉग्रेस पक्षाच्या कार्यालयाला कुलुप देखील ठोकले होते. कुणालाही विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जात असतील तर पक्षात राहून उपयोग काय अशी संतप्त भावना देखील हेमलता पाटील यांनी व्यक्त केली होती. पक्षाच्या अवघड परिस्थिती देखील पाटील या कायमच पक्षासोबत राहिल्या होत्या. मात्र त्यांच्या जाण्याने कॉग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असून आता डॉ हेमलता पाटील नेमक्या कोणत्या पक्षात जाणार याबाबत उत्सुकता लागली असून भाजपा अथवा शिंदे गटाच्या शिवसेनेला त्या पसंती देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading

Previous Post

वेदनादायक, नायलॉन मांजामुळे तरुणाने गमावला जीव

Next Post

अधिवेशनाला भुजबळांची दांडी ही बंडाची नांदी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White