• Latest
  • Trending
स्थानिकांना डावलून बाहेरच्यांना पालकत्व ?

स्थानिकांना डावलून बाहेरच्यांना पालकत्व ?

December 24, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

स्थानिकांना डावलून बाहेरच्यांना पालकत्व ?

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

मंत्रीपदानंतर पालकमंत्री पदासाठी महायुतीत रस्सीखेच

नाशिक : राज्यात महायुतीची सत्ता आली भाजपने 45 वर्षात पहिल्यांदाच सर्वाधिक 132 जागा घेत महायुतीत मोठ्या भावाचे स्थान पटकावले. आता मंत्रिपदाचे भांडण संपले मात्र पालकमंत्रीसाठी जोरदार रस्सीखेच महायुतीत सुरू झाली आहे. महायुतीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षाचे नाशिक जिल्ह्यात सात आमदार निवडून आले आहेत. त्यामध्ये अँड माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ यांना मंत्रीपदे मिळाली आहेत त्यात कोकाटे यांना कृषिमंत्री तर नरहरी झिरवाळ यांना अन्न व औषध खाते देण्यात आले आहे .त्याखालोखाल शिंदे गटाच्या शिवसेनेचे दोन आमदार आहेत. यामध्ये जेष्ठ असलेले दादा भुसे यांना शालेय शिक्षण मंत्री करण्यात आले. मात्र दुर्दैव या गोष्टीचे आहे की 132 आमदारांमध्ये भाजपचे नाशिक शहरातील तीन धरून जिल्हात पाच आमदार आहेत. यामध्ये देवयानी फरांदे, सीमा हिरे डॉ राहुल आहेर, दिलीप बोरसे हे चारही आमदार तिसऱ्यांदा निवडून आले आहेत तर अँड राहुल ढिकले आधी मनसे आणि नंतर भाजपातून दोनदा निवडून आले आहेत. तरीही यापैकी एकालाही मंत्रिपद मिळू नये हे विशेष, मुख्य म्हणजे या सर्व आमदारांची प्रतिमा आणि कामगिरी चांगली आहे. तरीदेखील नाशिक शहरातून भाजपचा मंत्री नसणे हे नाशिककरांच्या पचनी पडत नाही. आता मंत्रिपद झाल्यानंततर पालकमंत्री बनण्यासाठी चढाओढ सुरू आहे यामध्ये नाशिक साठी राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटे यांनी दावा ठोकला आहे कारण जिल्हात राष्ट्रवादीचे जास्त आमदार आहेत. तर दुसरीकडे दादा भुसे सलग पाचवेळा निवडून आले आहेत त्यामुळे ते इतरांच्या तुलनेत मंत्रिमंडळात वरिष्ठ आहेत त्यामुळे त्यांना पालकमंत्री पदाबाबत आशा आहे तर इकडे शांत असलेली भाजपा मोठी खेळी करण्याची शक्यता असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय व संकटमोचक गिरीश महाजन यांना पालकमंत्री केले जाऊ शकते गेल्या कुंभमेळ्याच्या वेळी महाजन हे नाशिकचे कुंभमेळा मंत्री होते त्यामुळे त्यांचा अनुभव पहाता पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांना दिली जाऊ शकते मात्र यामुळे नाशिककरांच्या तोंडाला पाने पुसल्यासारखे होणार आहे कारण तीन आमदार तिसऱ्यांदा निवडून दिले, त्याचबरोबर भाजपच्या पारड्यात भरभरून मतदान केले असताना देखील स्थानिकांना डावलून बाहेरील मंत्री करायचा आणि “पालक” म्हणून त्यांनाच डोक्यावर बसवायचे हे न पटणारे कोडे असून त्यात नाशिकच्या विकासात मोठी भूमिका असणाऱ्या छगन भुजबळ यांना पक्षाने खेळी करत मंत्रीपदा पासून लांब ठेवल्याची सल नाशिककरांमध्ये असताना आता बाहेरील मंत्री नाशिकचे पालक होणार यामुळे भविष्यात महायुतीला याची किंमत चुकवावी लागू शकते अशी चर्चाच सामान्य नागरिकांमध्ये आहे.

Loading

Previous Post

कृषिमंत्री कोकाटेंसमोर “कांद्याचे” आव्हान

Next Post

भाकरी फिरवली, महापालिकेच्या आयुक्तपदी राहुल कर्डीले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White