• Latest
  • Trending
“सशक्त”भारत बनवण्यात नाशिकच मोठं योगदान -पंतप्रधान मोदी

“सशक्त”भारत बनवण्यात नाशिकच मोठं योगदान -पंतप्रधान मोदी

November 8, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

“सशक्त”भारत बनवण्यात नाशिकच मोठं योगदान -पंतप्रधान मोदी

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

नाशिकमध्ये लढाई लढणारे विमान आणि सुरक्षा उपकरणे होतात तयार

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज नाशिक शहरातील तपोवन परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा संपन्न झाली या सभेला नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती .नाशिक शहरात महायुतीकडून मध्य नाशिक मतदारसंघात उमेदवार देवयानी फरांदे, नाशिक पूर्वमध्ये राहुल ढिकले आणि नाशिक पश्चिममध्ये उमेदवार सीमा हिरे आहेत. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीवर चौफेर टीका केली. त्याचबरोबर महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे देखील आव्हान मोदी यांनी केले . यावेळी केंद्र सरकारने केलेल्या कामांची देखील माहिती मोदी यांनी दिली. डबल इंजिनच्या सरकारमध्ये विकासाचा वेग दुप्पट होतो. त्यासोबतच योजनांचा लाभही दुप्पट होतो. पीएम किसान सन्मान निधी योजनेचा येथील शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. या योजनेअंतर्गत 12 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. राज्यात पुन्हा आमचं सरकार आल्यावर ही 12,000 रुपयांची मदत वाढवून 15,000 रुपये केली जाईल, ज्यामुळं लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा फायदा होईल.असेही नरेंद्र मोदी म्हणाले.महाराष्ट्रात उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत 5 लाखांहून अधिक महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आलं. जल जीवन अभियानांतर्गत राज्यातील 1.25 कोटींहून अधिक कुटुंबांना नळाच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. 7 कोटी गरीब लोकांना दर महिन्याला मोफत रेशन मिळत आहे, 26 लाखांहून अधिक लोकांना पीएम आवास योजनेचा फायदा झाला आहे, त्यांना स्वतःचं घर सरकारकडून देण्यात आलं, त्यामुळं महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचं सरकार येणं आवश्यक आहे. देश नवं-नवीन रेकॉर्ड बनवत आहे. 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या बाहेर आले.नाशिक डिफेन्स सेक्टर मध्ये भारताच्या आत्मनिर्भरतेचा मोठा केंद्रबिंदू बनत आहे. नाशिकमध्ये लढाई लढणारे विमान आणि सुरक्षा उपकरणे बनवण्यात येत आहेत. नाशिकच्या प्रत्येक व्यक्तीला गर्व आहे की सशक्त भारतासाठी आपले शहर (नाशिक) महत्वाची भूमिका पार पाडत आहे. मात्र महाविकास आघाडीवाले यामध्ये खोडा घालत असून डिफेन्स क्षेत्रात ते भारत देशाला मागे लोटत आहेत. एचएल बाबतीत याच लोकांनी अनेक अफवा पसरवल्या कर्मचाऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्न केला मात्र आज एचएल रिकोर्ड नफा बनवणारी कंपनी बनली आहे.काँग्रेस आपल्या पायांवर उभी राहू शकत नाही. त्यामुळे काँग्रेसने राजकारणात स्वत:ला वाचवण्यासाठी स्वत:चं सर्वात मोठं हत्यार उपसलं आहे. ते हत्यार म्हणजे एससी, एसटी आणि ओबीसींची एकात्मता तोडा आणि राज्य हिसकवा असादेखील आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची पर्वा आहे, ना कोर्टाची, ना देशाच्या भावनेची पर्वा आहे. ते फक्त दिखाव्यासाठी खिशात खाली पानांचे संविधान घेऊन फिरतात”, असा टोला मोदींनी लगावला.

Loading

Previous Post

जॉगिंग ट्रॅक परिसरात वसंत गिते यांच्या भेटीगाठी

Next Post

“भयमुक्त” नाशिक करण्यासाठीच उमेदवारी -वसंत गिते

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White