पूर्ववैमनस्यातून गॅस गँगच्या टोळक्याने हल्ला केल्याची चर्चा

नाशिक : पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कॅफेमध्ये चहा पिण्यासाठी बसलेल्या राशीद हारून खान (वय 22,रा. अंबड लिंक रोड) याच्यावर भरदिवसा पूर्ववैमनस्यातून चॉपर, कोयत्यांनी सपासप वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली होती.यामध्ये पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती आली असून राशीदच्या मैत्रिणीने त्याला चहा पिण्यासाठी बोलाविले होते यावेळी तो आल्यानंतर तिने मारेकऱ्यांना त्याची टीप दिली. तरुणाचा खून पूर्ववैमनस्यातून—— संबंधित प्रकरणात पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आल्याचं कारण आता समोर आलं आहे. अंबडला जोडणाऱ्या रस्त्यावरच असलेल्या दत्तनगर आणि खाडी परिसरातील रहिवासी असलेल्या राशिदवर त्याच्याच परिसरातील गॅस गँगच्या टोळक्यांनी काही महिन्यांपूर्वी वाद घातला होता. त्यानंतर संबंधित प्रकरणाची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पण, पोलिसांकडून कसलीही कठोर कारवाई केली गेली नसल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला.यामध्ये गयासुद्दिन हा प्रमुख असून तेव्हापासून व गयासुद्दिन परराज्यात पळून गेला असून राशीद हा कॅफेमध्ये आल्यानंतर त्याने तेथून संपर्क साधत येथील दोघा साथीदारांना पाठवून राशीद वर हल्ला चढविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मैत्रिणीने चहा प्यायला बोलावून टीप दिली आणि घात केला —— पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या एका रस्त्यावरील निसर्ग कॉलनीतील एका कॅफेत राशिदला त्याच्या मैत्रिणीने चहा प्यायला बोलावले होते. त्यानंतर संबंधित तरुणीने राशिद आल्याची माहिती दिली, असं पोलिसांनी तपासातून सांगितलं आहे.
हल्लेखोर घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी राशिदवर कोयत्याने आणि चॉफरने वार केले. यामुळे पथकाने त्या युवतीलाही ताब्यात घेत या गुन्ह्यात आरोपी केले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांनी तिच्या सह एकूण सहा संशयित आरोपीना ताब्यात घेतले आहे. इंदिरानगर गुन्हे शोध पथकासह गुन्हे शाखेचे युनिट एक व दोनचे पथक उर्वरित मारेकऱ्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहेत.

![]()












