• Latest
  • Trending

मित्रांकडूनच असहकार्याने महायुतीत टेन्शन !

May 11, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

मित्रांकडूनच असहकार्याने महायुतीत टेन्शन !

YOU MAY ALSO LIKE

नाशकातील अमरधाम जवळ भल्या पहाटे भीषण अपघात

शाळा, महाविद्यालय परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवा;सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

मनधरणी करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू….

नाशिक :राज्यात अद्याप दोन टप्प्यात 24 मतदार संघातील मतदान बाकी आहे. त्याचबरोबर मतदानासाठी काही दिवस शिल्लक असताना महायुतीचे विविध मतदार संघांमधील नेते, आमदार, हे मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे नसल्याचे चित्र दिसत नसल्याने महायुतीची चिंता वाढली आहे. वरिष्ठ पातळीवरून एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू आहेत मात्र हवे तसे यश त्यात आलेले नाही. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक शहरात आले होते यादरम्यान त्यांनी भेटीगाठी घेत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता मात्र मुख्यमंत्री शिंदे यांची पाठ फिरताच नाराजी-नाट्य पुन्हा उफाळून आले आहे. याची सुरुवात केली ती शिंदे गटाचे आ सुहास कांदे यांनी .नांदगाव मतदारसंघातील आ सुहास कांदे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. कांदे म्हणाले राष्ट्रवादी कॉग्रेसचे खायचे आणि दाखवायचे दात वेग-वेगळे आहेत, अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना महायुतीकडून मंत्रिपद मिळाले असतानादेखील ते तुतारीचा प्रचार करत आहेत. त्यांना तुतारीचा एवढा पुळका आला असेल तर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले दिंडोरीत कांदा प्रश्नी उमेदवार भारती पवार यांच्याबद्दल आधीच लोक नाराज आहेत. त्यात आणखी कांदे करत असलेल्या अशा आरोपांमुळे दोन कांद्याचा त्रास भारती पवार यांना व्हायला नको. सुहास कांदे यांनी त्यांचे काम करावे आम्ही आमचे काम करतो, आमच्या निष्ठेचे सर्टिफिकेट त्यांनी देऊ नये. असा टोला भुजबळ यांनी लगावला यामुळे महायुतीत किती विसंवाद आहे याचे दर्शन घडले. तर दुसरीकडे हेमंत गोडसे यांच्या प्रचारापासून लांब असलेले सिन्नरचे राष्ट्रवादीचे आ माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि हेमंत गोडसेंविरोधात तक्रारीचा पाढाच वाचला. गोडसे यांच्याकडून मतदारसंघात हस्तक्षेप केला जातो व माझ्या समर्थकांना त्रास दिला जातो. मग त्यांचा प्रचार कशासाठी करायचा असा सवालच कोकाटे यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदे केला गेला. यावर मुख्यमंत्री म्हणाले माझ्याकडे बघून प्रचाराला लागा. मात्र येत्या दोन दिवसात समर्थकांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची भूमिका कोकाटे यांनी जाहीर केली मुख्य म्हणजे कोकाटे देखील अजित पवार गटाचेच आहेत. तर दिंडोरी तालुक्यातील तीसगाव येथे शरद पवार गटाचे उमेदवार भगरे यांच्या प्रचारसभेला दिंडोरीचे अजित पवार गटाचे आ नरहरी झिरवाळ यांनी हजेरी लावल्याने चर्चेला उधाण आले आहे. हा फोटो व्हायरल झाल्याने भाजपाने याची गंभीर दखल घेतली आहे. यावर बोलताना झिरवळ म्हणाले आपण मारुती मंदिराच्या कार्यक्रमास गेलो होतो मात्र गावकऱ्यांनी व्यासपीठावर बसण्याचा आग्रह केला. मात्र मी कोणतेही भाषण केले नाही. आज मात्र सातपुरच्या हेमंत गोडसेंच्या बाईक रॅलीत छगन भुजबळ यांनी हजेरी लावल्याने गोडसे यांना दिलासा मिळाला. मात्र यामुळे शिंदेगटाच्या शिवसेनेची व भाजपाची डोकेदुखी ही मित्रांनीच वाढवल्यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून फटका बसू नये म्हणून मनधरणी करण्याची शक्यता आहे. अन्यथा याचा फटका बसण्याची शक्यता राजकिय जाणकार व्यक्त करत आहेत.

Loading

Previous Post

नाशिक शहरात ढगांच्या गडगडाटासह वादळी-वारे व जोरदार पाऊस

Next Post

‘आप’तर्फे अरविंद केजरीवालांच्या समर्थनार्थ जल्‍लोष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White