महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता, “मध्य” मतदारसंघात होणार मोठ्या घडामोडी ?

नाशिक :विधानसभेच्या निवडणुकीत सध्या नाशिक शहरातील मध्य मतदारसंघ हॉट म्हणून ओळखला जाऊ लागला असून याला कारण देखील तसेच आहे. मध्य मतदारसंघात अनेक दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत ,सुरवातीला महाविकास आघाडीत मध्य मतदारसंघवरून रस्सीखेच सुरू असतानाच हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे गेला पर्यायाने ठाकरे गटाकडून माजी आमदार वसंत गिते यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर कॉग्रेस मध्ये नाराजीचे फटाके फुटण्यास सुरवात झाली आणि कॉग्रेसच्या माजी नगरसेविका डॉ हेमलता पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत महाविकास आघाडीला दे धक्का दिला. तर इकडे महायुतीत भाजपाने थांबा आणि वाट पहाची भूमिका घेत विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांचे नाव सुरवातीच्या यादी मधून गायब केले. त्यानंतर बरेच महाभारत घडले 21 नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि दुसऱ्याच यादीत विद्यमान आमदार देवयानी फरांदे याना मध्य मतदारसंघातुन पुन्हा एकदा भाजप कडून उमेदवारी मिळाली. मात्र इकडे महाविकास आघाडीला अजूनही धक्के बसत असून काही दिवसांपूर्वी मुंबई येथे जाऊन कॉग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेणारे व कॉग्रेस कडून उमेदवारी मिळावी म्हणून कॉग्रेस भवन नाशिक येथे मुलाखत देणारे माजी नगरसेवक गुलजार कोकणी यांनी आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असून मध्य मध्ये निर्णायक ठरणारे मुस्लिम मतदान गुलजार कोकणी यांच्याकडे वळाले तर ठाकरे गटाच्या शिवसेनेला याचा धक्का बसू शकतो अशी शक्यता राजकिय जाणकार व्यक्त करत असून गुलजार कोकणी यांचा हिंदू समाजात देखील मोठा मित्र-परिवार असल्याने महाविकास आघाडीची डोकेदुःखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या दोन ते तीन दिवसात नाशिकच्या “मध्य” मतदारसंघात मोठ्या घडामोडी होण्याच्या शक्यता आहे. याकडे राजकीय राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे.



![]()












