बंडखोर मैदानात,अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस

नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक असतानाच सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. महाविकास आघाडी, महायुती, मनसे यांच्यासह अपक्ष बंडखोरांनी अर्ज भरल्याने निवडणुकीत रंगत भरली आहे. दिवसभरात 33 उमेदवारांनी 43 अर्ज दाखल केले

अर्ज भरताना सर्वच पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावली यामध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे,, खा. राजाभाऊ वाजे, हेमंत गोडसे, सलीम शेख, सुनील बागुल, विनायक पांडे, लक्ष्मण सावजी, सुदाम कोंबडे, उपस्थित होते.

या उमेदवारांनी अर्ज केले दाखल आ. देवयानी फरांदे (नाशिक मध्य) भाजप ,आ राहुल ढिकले (नाशिक पूर्व) भाजप, आ सीमा हिरे (नाशिक पश्चिम ) भाजप, वसंत गिते (नाशिक मध्य)ठाकरे गट शिवसेना) दिनकर पाटील (नाशिक पश्चिम) मनसे, अंकुश पवार (नाशिक मध्य)मनसे, प्रसाद पवार (नाशिक पूर्व) मनसे, आ सरोज आहिरे (देवळाली) अजित पवार राष्ट्रवादी, दशरथ पाटील (नाशिक पश्चिम) स्वराज्य पक्ष, जितेंद्र भावे (नाशिक पूर्व)निर्भय महाराष्ट्र पार्टी,नितीन रेवगडे (नाशिक पश्चिम) महाराष्ट्र निर्भय पार्टी, हेमलता पाटील (नाशिक मध्य) कॉग्रेस बंडखोर) शशिकांत जाधव (नाशिक पश्चिम) भाजप बंडखोर



![]()












