बंडखोरांनी माघार घेताच महाविकास आघाडीला दिलासा

नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून अस्पष्ट असणारे चित्र आज स्पष्ट झाले असून विधानसभा निवडणुकीत नाराज असणाऱ्या अनेक इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र आज अखेर बंडखोरांना थंड करण्यात महायुती व महाविकास आघाडी या दोघांना यश आल्याचे चित्र आहे . नाशिक मध्य मतदारसंघात महाविकास आघाडीला सर्वात जास्त बंडखोरांचे आव्हान होते यामध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेने माजी आमदार वसंत गिते यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कॉग्रेस मधील नेत्यांनी बंडाचे निशाण फडकावले होते यामध्ये कॉग्रेसच्या डॉ हेमलता पाटील, अल्पसंख्याक सेलचे हनिफ बशीर व माजी नगरसेवक गुलजार कोकणी होते या सर्वांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने ठाकरे गटाच्या शिवसेनेची धाकधूक वाढली होती मात्र आज यांचे बंड थंड करण्यात कॉग्रेसला मोठे यश आले असून ठाकरे गटाच्या शिवसेनेचे वसंत गिते यांना आता निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता मध्य नाशिक मतदारसंघात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे माजी आमदार वसंत गिते, भाजपच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे आणि वंचित बहुजन आघाडीचे मुशीर सय्यद यांच्यात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

![]()











