मध्य सारख्या हॉट मतदारसंघाचा कल कुणाकडे ?

नाशिक : विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या आणि नाशिक मध्य मतदारसंघ हा ‘हॉट’ मतदारसंघ ठरत गेला. अनेक घडामोडींमुळे हा मतदारसंघ चर्चेत राहिला सुरवातीच्या काळात महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी ठाकरेंची शिवसेना व कॉग्रेस पक्षात मोठी रस्सीखेच झाली, कॉग्रेसपक्षाने दावा ठोकत मध्य आमचाच म्हणून घोषणा केली. आणि माजी नगरसेविका डॉ हेमलता पाटील यांनी उमेदवारीची तयारी सुरू केली आणि इकडे मुंबई मध्ये मोठ्या घडामोडी होऊन ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून माजी आमदार वसंत गीते यांना एबी फार्म देत महाविकास आघाडी कडून वसंत गीते हेच उमेदवार असतील अशी घोषणा करण्यात आली. तर इकडे भाजपची पहिली यादी जाहीर झाली यामध्ये दोन्ही विद्यमान आमदारांचे नावे होती मात्र फरांदे याचे नाव नसल्याने व महायुतीचा उमेदवार घोषित होत नसल्याने कार्यकर्ते समभ्रमात होते. त्याक्षणी आमदार देवयानी फरांदे यांनी 21 नगरसेवकांबरोबर ‘सागर’ बंगला गाठत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गळ घातल्यानंतर दुसऱ्या यादीत देवयानी फरांदे यांच्या उमेदवारीची घोषणा भाजपने केली. इकडे मात्र वसंत गीते यांच्या नावाची महाविकास आघाडीच्या वतीने घोषणा होताच. कॉग्रेसच्या डॉ हेमलता पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र शेवटच्या क्षणी बंडखोरी शमवण्यात कॉग्रेसला यश आले आणि अनेकांनी माघार घेत महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांना पाठींबा जाहीर केला .मात्र मुशीर सय्यद यांच्या रूपाने एक आव्हान गीते यांच्यापुढे उभे राहिले आणि यातूनच एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते आणि महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे आमने-सामने उभे ठाकले . मग हिंदू-मुस्लिम संमिश्र असलेल्या मतदारसंघात जोरदार व आक्रमकपणे प्रचाराला सुरवात झाली.दाट लोकवस्तीच्या या मतदारसंघात वडाळा, जुने नाशिक,गंगापूर रोड, अशोक स्तंभ यासारखे भाग येतात याठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांनी ड्रग्ज, वाढती गुन्हेगारी, व बेरोजगार युवकांच्या हाताला रोजगार हे मुद्दे आक्रमक पणे मांडत प्रचारात रंगत आणली.दुसरीकडे महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, वोटजिहाद विरोधात धर्मयुद्ध असे मुद्दे प्रचारात आणत मतदारसंघात अजून वातावरण गरम केले. या सर्व मुद्यांभोवती मध्य नाशिकची निवडणूक फिरताना दिसली. मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदानाचा मोठा टक्का वाढलेला दिसून आला त्याचबरोबर मतदानाच्या दिवशी जुन्या नाशिकबरोबर वडाळाचे झालेले मतदान आणि गंगापूर, इंदिरानगर, भाभानगरसह झालेल्या मतदानाची आकडेवारी बघितल्यावर वाढलेला टक्का कोणाच्या पदरात पडणार हे सांगता येणे अवघड आहे. मात्र याठिकाणी हिंदुत्वाचा जो मुद्दा भाजपच्या वतीने व अन्य हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जोरदार पणे राबवण्यात आला होता त्याला यश मिळण्याची चर्चा सध्या मध्य मतदारसंघात असून मुख्य म्हणजे यावेळी मतदानाच्या मशीनवरून पंजा हे चिन्हच गायब होते. त्यामुळे अदृश्य पंजाने ठाकरे गटाच्या शिवसेनेची मशाल पेटवण्यात किती साथ दिली हे निकालानंतरच कळेल मात्र नाशिक मध्य चा कल हा लोकसभेच्या निकालापेक्षा वेगळा असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत असून, शासनाची लाडकी बहीण ही या मतदारसंघातील “लाडक्या भावाला” साथ देते की “लाडक्या बहिणीला” जवळ करते ते उद्याच्या निकालात कळेलच. मध्य नाशकात याआधी काय घडले — 2009 च्या निवडणुकीत राज ठाकरे यांच्या मनसेची नाशिक शहरात लाट होती त्या लाटेत नाशिक मध्य मध्ये तत्कालीन मनसेचे सरचिटणीस वसंत गीते यांनी कॉग्रेसच्या उमेदवार डॉ शोभा बच्छाव यांच्यावर तब्बल 32 हजारांच्या मतधिक्याने मात केली होती. त्यामुळे नाशिक मध्ये काही काळ मनसेचा गड होता. मात्र 2014 मध्ये भाजपच्या उमेदवार प्राध्यापक देवयानी फरांदे यांनी मनसेच्या गीते यांच्यावर 28 हजारांच्या फरकासह विजय मिळवला. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत प्राध्यापक देवयानी फरांदे यांनी विजयाची पुनरावृत्ती करताना काँग्रेसच्या डॉक्टर हेमलता पाटील यांच्यावर सुमारे 28 हजाराच्या मताधिक्यानेच मात केली होती.त्यामुळे या इतिहासाची पुनरावृत्ती देवयानी फरांदे करणार का याकडे मध्य नाशिकचे लक्ष लागून आहे


![]()












