राजकीय लागेबांधे अजूनही स्पष्ट नाही, ती रक्कम आयकर खात्याच्या ताब्यात

नाशिक : विधानसभा निवडणुकीचे वारे संपूर्ण महाराष्ट्रात वाहत असतानाच नाशिक शहरातील हॉटेलमध्ये 1 कोटी 98 लाख रुपये मिळून आल्याने शहरात खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डी परिसरातील हॉटेल रेडिसनमध्ये ही रक्कम मिळून आली होती. मात्र ही रक्कम कोणत्या पक्षाची ? अथवा यामध्ये कोणाचे राजकीय लागेबांधे हे अजूनही स्पष्ट झाले नाही. सुरवातीला ही रक्कम ज्या रूममधून ताब्यात घेण्यात आली होती .आणि जी व्यक्ती त्या रूममध्ये वास्तव्यास होते त्यांचा संबंध शिंदे गटाच्या शिवसेनेबरोबर असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात त्या व्यक्तीच्या राजकीय संबंधांचा कुठेही उल्लेख नसल्याने कारवाईवर मर्यादा येत आहेत. याचा पार्श्वभूमीवर तपासी पथकाच्या अधिकारी मित्तल यांनी सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याचा तपास पोलिसांकडे दिल्याचे कळते यासंदर्भात अजूनही एफआयआर दाखल नसल्याने पोलीस कशी कारवाई करतात याकडे इतरांचे लक्ष लागून आहे. मुख्य म्हणजे यादरम्यान या ठिकाणी मंत्रालयात अधिकारी असणाऱ्या महिला उपस्थित होत्या. यातील महत्वाची माहिती म्हणजे त्या मंत्रालयातील महिला अधिकारी या शिंदे गटाच्या शिवसेनेच्या देवळाली मतदारसंघातील उमेदवार डॉ राजश्री अहिरराव यांच्या भगिनी असल्याचे समजते त्यामुळे याबाबत तपास सुरू असून यातील अनेक बाबी तपासणार असून आलेली रक्कम कोणी दिली ? त्याचा वापर कशासाठी होणार होता ? त्याचबरोबर आयकर खात्याच्या नियमानुसार ही रक्कम बेहिशोबी असल्यास आयकर खात्याकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.


![]()












