• Latest
  • Trending
“पश्चिम”कमी मतदान कोणाला विजयाच्या जवळ नेणार ?

“पश्चिम”कमी मतदान कोणाला विजयाच्या जवळ नेणार ?

November 22, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

“पश्चिम”कमी मतदान कोणाला विजयाच्या जवळ नेणार ?

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

लाडकी बहीण नेमकी कोणाच्या मागे ? खान्देशी मतदारांच्या भूमिकेकडे लक्ष

नाशिक : पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीने विद्यमान आमदार सीमा हिरे यांना उमेदवारी जाहीर करत बाजी मारली. मात्र मतदारसंघात स्वपक्षाच्या नेत्यांनी बंडखोरी केल्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली होती. थोड्याफार प्रमाणात बंडखोरी थोपवण्यात भाजपला यश आले. तर इकडे शिवसेना ठाकरे गट व महाविकास आघाडीच्या वतीने सुधाकर बडगुजर  यांना उमेदवारी जाहीर झाल्याने या दोन उमेदवारांमध्ये लढत होती. मात्र ऐनवेळी भाजपचे बंडखोर दिनकर पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत उमेदवारी मिळवल्याने या ठिकाणी  तिरंगी लढत बघायला मिळणार आहे. दिनकर पाटील यांनी भाजप कडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आधीच तयारी केल्याने त्यांची ही तयारी विधानसभेसाठी उपयुक्त ठरली. सिडको परिसरात सुधाकर बडगुजर यांच्यासाठी चांगले वातावरण होते तर सातपूर परिसरात दिनकर पाटील यांचा बोल-बाला असल्याचे चित्र होते त्याचबरोबर बहुसंख्येने असलेले खान्देशी मतदार पुन्हा एकदा भाजपच्या बाजूने झुकतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्या सभेनंतर मतदारांनमध्ये चर्चा होती त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे यांचा करिष्मा चालतो का याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून आहे. मुख्य म्हणजे पश्चिम मतदारसंघात कामगार नेते डॉ डी. एल .कराड हे यावेळी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या पाठीशी असल्याने प्रत्येक निवडणुकीत ते 17 ते 20 हजार मते मिळवतात यावेळी हे मतदान बडगुजरांकडे वळवण्यात कराड यशस्वी होतील का हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 2 लाख 26 हजार 87 महिला मतदार याच मतदारसंघात होत्या त्यापैकी 56 टक्के महिलांनी आपला हक्क बजावला आहे. या लाडक्या बहिणी पुन्हा एकदा सीमा हिरे यांच्या मागे भक्कमपणे उभ्या राहतात का हे बघणे देखील महत्वाचे ठरेल .या मतदारसंघात खटकणारी गोष्ट म्हणजे सर्वात जास्त मतदार या मतदारसंघात असताना सर्वात कमी झालेले मतदान कोणाच्या फायद्याचे ठरणार 56.71 मतदान या मतदारसंघात झाले आहे .भाजप आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेत झालेला राडा यामुळे हा मतदारसंघ प्रकाशझोतात होता .त्यामुळे सीमा हिरे यांच्या मागे खान्देशी मतदार जाणार का अथवा कसमा की उत्तर भारतीय मतदान महत्वाचे ठरणार अथवा यांच्या मतविभाजनाचा फायदा दिनकर पाटील यांना होणार हे उद्याच्या मतमोजणीतच समजेल. 2009 चा निकाल असा– नितीन भोसले-मनसे- 52,855, नाना महाले-राष्ट्रवादी-28,117, दशरथ पाटील -अपक्ष- 19,734,डॉ डी. एल. कराड-सिपीएम-18,812,राहुल आहेर-भाजप- 14206            2014 चा निकाल असा–  सीमा हिरे-भाजप-67,489,सुधाकर बडगुजर-शिवसेना-37,819, शिवाजी चुभळे-राष्ट्रवादी-30,236 , दशरथ पाटील- कॉग्रेस-21,981 डॉ डी. एल. कराड-सिपीएम-16,870              2019 चा निकाल असा– सीमा हिरे -भाजप-78,041, डॉ अपूर्व हिरे-राष्ट्रवादी-68,295,दिलीप दातीर-मनसे-25,501,डॉ डी.एल. कराड-सिपीएम-22,657, विलास शिंदे- अपक्ष-16,429

Loading

Previous Post

“मध्य”मध्ये आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला !

Next Post

आहिरे,घोलप, अहिरराव तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White