• Latest
  • Trending

“बॉस”ला पुन्हा जेलवारी घडवत 30 युवकांवर गुन्हे दाखल

July 27, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

“बॉस”ला पुन्हा जेलवारी घडवत 30 युवकांवर गुन्हे दाखल

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

गुन्हेगाराच्या नातेवाईक व मित्रपरिवाराला काढलेली मिरवणूक चांगलीच भोवली

नाशिक : आधी केलेल्या गुन्ह्यातील  जेल मधून सुटका झाल्यानंतर मित्रमंडळी, नातेवाईक व घरातील सदस्यानी “बॉस इज बॅक” म्हणत काढलेली मिरवणूक त्या गुन्हेगारासह नातेवाईकांना चांगलीच भोवली असून पोलिसांनी मिरवणुकीत सहभागी असलेल्या एक -एक सदस्यांना शोधून काढत गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे. नाशिक शहरातील पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेलमध्ये असलेला सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर याची काही दिवसांपूर्वी जेलमधून सुटका झाली होती. त्यांनतर घरी पोहचल्यावर नातेवाईक व इतर मित्रमंडळीनी त्याच्या निवासस्थानापासून मिरवणूक काढली आणि त्यांनतर त्या मिरवणुकीचे रिल्स, फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आले. यामुळे नाशिककरांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या हे पहात पोलिसांनी संपूर्ण नाशिक शहरात धाडसत्र राबवत मिरवणुकीत सहभागी झालेल्यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. या मिरवणुकीतील 1 कार व 3 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून सराईत गुन्हेगार व त्याचे नातेवाईक, मित्र परिवार अशा 30 हुन अधिक इसमांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 19 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचबरोबर मिरवणुकीत सामील  इतर गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे. मुख्य गुन्हेगार व त्याच्या साथीदाराला यापूर्वीच्या दाखल गुन्ह्यांमध्ये पुन्हा अटक करून त्यांची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली मुख्य म्हणजे पोलिसांनी या कारवाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत एकप्रकारे गुन्हेगार व त्यांच्या समर्थकांना इशाराच देण्याचा प्रयत्न केला आहे. तडीपारास मध्यरात्री पोलिसांनी घेतले ताब्यात नाशिक शहरातून तडीपार असूनही राजरोसपणे शहरात वावरणाऱ्या गोपाल नागोलकर यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत रात्री बारा वाजेच्या सुमारास तिबेटियन मार्केट येथील एका हॉटेलमधून बाहेर पडत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले . याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरकर याच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याविरोधात तडीपारीची कारवाई केलेली असताना रात्री तो एका हॉटेलमध्ये जेवणासाठी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिथे सापळा रचत त्याला ताब्यात घेतले.

Loading

Previous Post

नाशकात गुन्हेगारांचे मिरवणुकीद्वारे शक्तिप्रदर्शन…..

Next Post

नाशकात गुन्हेगारांची हिंमत वाढली की पोलिसांचा धाक कमी झाला ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White