अंबड परिसरात चक्क पोलीस अधिकाऱ्यांवरच हल्ला तर सिन्नर फाटा परिसरात भरदिवसा खून

नाशिक : संपूर्ण भारतभर नाशिक शहराची ओळख तीर्थक्षेत्र म्हणून असताना आता नाशिक शहराच नाव गुन्हेगारी क्षेत्रात देखील पुढे येऊ लागले असून आता तर चक्क पोलिसांवर हल्ले करण्याची मजल गुन्हेगारांची होऊ लागल्याने नाशिक शहरात राज्य कायद्याचे की गुन्हेगारांचे असा सवाल नागरिक करू लागले आहेत 2 ऑगस्ट रोजी एकीकडे पोलीस पथकावर हल्ला होत असतात दुसरीकडे नाशिकच्या सिन्नर फाटा परिसरात युवकावर भरदिवसा हल्ला करून खून करण्यात आल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे .सिन्नरफाटा येथील लक्ष्मी टॉवर येथे यश टायर्स दुकानाजवळ प्रमोद वाघ (40,रा. सिन्नरफाटा ) व योगेश रामदास पगारे (रा. चेहडीशिव) सद्दाम मलिक (रा जयभवानी रोड) यांच्यात जमिनीच्या कारणावरून वाद झाला. मलिक याने लोखंडी सळईने प्रमोदच्या डोक्यात मारल्याने प्रमोद गंभीर जखमी झाला यादरम्यान योगेश व सद्दाम यांनी घटनास्थळावरून पळ काढला तर डोक्यात मार लागल्याने उपचार सुरू असताना प्रमोदचे निधन झाले.तर दुसऱ्या घटनेत अंबड परिसरात पोलीस अधिकाऱ्यांवरच हल्ला करण्यात आला. केवल पार्क परिसरात दोन गटात वाद सुरू होता ही घटना अंबड पोलिसांना कळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले यादरम्यान अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार हे दोन्ही गटाची समजूत काढत असतानाच त्यांच्या दोन्ही हातांवर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न करून शिवीगाळ देखील करण्यात आली हल्ला वाचविण्याच्या प्रयत्नात पवार यांच्या दोन्ही हातांना गंभीर इजा झाली यावेळी पवार यांना वाचविण्यासाठी पुढे आलेल्या पोलीस उपनिरीक्षक सविता उंडे यांनाही मारहाण करण्यात आली. यानंतर गुंड व त्यांच्या समर्थकांनी पोलीस पथकावर हल्ला करण्याचा जोरदार प्रयत्न केला. कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांवरच असे हल्ले गुंड करणार असतील तर सामान्य नागरिकांचे काय असा सवाल आता नागरिक करू लागले असून संताप देखील व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर पोलीस कुमक मागवण्यात आली व हल्लेखोरांना जेरबंद करण्यात आले.भांडण कशामुळे ? जागेच्या ताबा कोणाचा यावरून दोन गटात वाद झाला. केवळ पार्कला वडिलोपार्जित जागा असून ती बिल्डरला विकण्यात आली आहे. ज्यांच्या नावावर जागा आहे त्यांचे निधन झाले असून बिल्डरने आमच्या खोट्या सह्या घेऊन जागेचा व्यवहार करून गाळे उभारल्याचे हल्ला करणाऱ्या संशयीतांच्या कुटूंबियांचे म्हणणे आहे. तर बिल्डर सोनवणे यांच्या म्हणण्यानुसार ते न्यायालयात गेले असता जागेवर नळ कनेक्शनसाठी न्यायालयाने परवानगी दिली होती मात्र नळ कनेक्शनला देखील विरोध केल्याने वाद वाढत गेला

![]()












