• Latest
  • Trending

नाशकात गुन्हेगारांचे मिरवणुकीद्वारे शक्तिप्रदर्शन…..

July 26, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात गुन्हेगारांचे मिरवणुकीद्वारे शक्तिप्रदर्शन…..

YOU MAY ALSO LIKE

नाशिकमध्ये मित्राने मोबाईलचा रिमोट ॲक्सेस घेतला आणि विवाहितेने जीवन संपवलं

नाशिकचा ‘तो’ नेता तुरुंगातून लढविणार निवडणूक

हे खपवून घेतले जाणार नाही पोलिसांचा गुन्हेगारांना इशारा

नाशिक : गोली मार भेजेमे…. कल्लू मामा… हे वाक्य (गाणे) काही वर्षांपूर्वी चित्रपटात पार्टी करताना गुन्हेगारी प्रवृत्तीचे गुन्हेगार म्हणताना दिसायचे, मुंबई शहरातील अंडरवर्ल्ड मुंबई पोलिसांनी अगदी व्यवस्थित संपवली मात्र त्यानंतर राजकीय आशीर्वाद लाभलेले गुंड समाजात वावरू लागले यांच्याकडील महागड्या गाड्या, तरुणांमध्ये वाढती क्रेज, यामुळे हे गावगुंड तरुणांच्या गळ्यातील ताईत बनू पहात आहेत.याचे उदाहरण म्हणजे पुण्यातील गुंड गजा मारणे, जेल मधून सुटल्यानंतर याच गजा मारणे याने आपल्या समर्थकांसह पुण्यात मोठे शक्तिप्रदर्शन करत मिरवणूक काढली होती त्यात कारसह दुचाकीवाले देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते ते चित्र पाहून नाशिककरांनी संताप व्यक्त केला होता .मात्र याच वाढत्या नाशिकची पाऊले हळूहळू पुणे, मुंबईच्या दिशेने पडू लागली आहेत. आधीच नाशकात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली त्यात खून तर नित्याचेच आता मात्र पुण्यापाठोपाठ नाशिक शहरात देखील कारागृहातुन सुटलेले गुंड आपल्या समर्थकांसह मिरवणूक काढून गावभर फिरू लागल्याने नाशिककरांच्या पायाखालची जमीनच सरकली मात्र नाशिक पोलिसांनी देखील कायद्याच्या दंडुका उगारून हे पुणे नाही तर नाशिक असल्याचे दाखवून देत हे खपवून घेतले जाणार नसल्याचा इशाराच दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले .

मिळालेल्या माहितीनुसार एमपीडीए अंतर्गत हर्षद सुनील पाटणकर हा शिक्षा पूर्ण करून मंगळवारी कारागृहातुन सुटला असता त्याच्या टोळीच्या सदस्यांनी मोटार सायकलवर मोठं-मोठ्याने घोषणा देत वाहनांचे कर्ण-कर्कश हॉर्न वाजवत विना परवानगी वाहन रॅली व पायी मिरवणूक काढली. यावेळी हुल्लडबाजी करत जोरदार घोषणा देण्यात आल्या यामुळे पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करून जनमानसात भीती निर्माण केली म्हणून सरकारवाडा पोलीस ठाण्यात मुख्य संशयित आरोपींसह इतर सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्याचबरोबर ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते जे मिरवणूकित सहभागी झाले होते ते दोघेही तडीपार असून त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. मुख्य म्हणजे पुण्यात ज्या गज्या मारणे या कुख्यात गुंडाने जेलमधून बाहेर पडल्यानंतर मिरवणूक काढली होती त्यावेळी देखील तत्कालीन आयुक्त संदीप कर्णिक यांनी मारणे टोळीवर कठोर कारवाई केली होती. आणि आता देखील नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ही कारवाई करत पुणे पॅटर्न नाशकात चालणार नसल्याचा इशाराच दिला असून या कारवाईची माहिती पोलिसांनी सोशल मीडियावर देखील शेअर केली आहे.

Loading

Previous Post

फक्त बदल्या करून गुन्हेगारी आटोक्यात येईल का ?

Next Post

“बॉस”ला पुन्हा जेलवारी घडवत 30 युवकांवर गुन्हे दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White