• Latest
  • Trending
फरांदे यांचा तिसऱ्यांदा “जय श्रीराम “

फरांदे यांचा तिसऱ्यांदा “जय श्रीराम “

November 24, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

फरांदे यांचा तिसऱ्यांदा “जय श्रीराम “

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

मतांचा वाढलेला टक्का महाविकास आघाडीला बसला धक्का

नाशिक : नाशिक मध्य मतदारसंघ हा आरोप-प्रत्यारोपाने गाजला अत्यंत हॉट मतदारसंघ म्हणून मध्य कडे बघितले जात होते या मतदारसंघात भाजप महायुतीच्या प्रा.देवयानी फरांदे आणि ठाकरे गटाच्या शिवसेना व महाविकास आघाडीच्या वतीने माजी आ.वसंत गीते हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या ठिकाणी फरांदे आणि गीतेंमध्ये शेवटपर्यंत काट्याची लढत झाली. जुन्या नाशिकमधील काही जागांवर वसंत गीते यांना जास्तीचे मते पडत होती. सुरवातीच्या काही फेऱ्यांमध्ये गीते यांना फरांदे यांच्या पेक्षा जास्त मतदान पडत होते. मात्र देवयानी फरांदे यांनी टपाली मतदानापासून आघाडी मिळवली होती. त्याचबरोबर 22 फेऱ्यांमध्ये फरांदे या गीते यांच्यापेक्षा पुढेच राहिल्या या चुरशीच्या लढतीत अखेर भाजपच्या देवयानी फरांदे यांनी बाजी मारत विजय मिळविला. ड्रग्ज प्रकरणात झालेला नकारात्मक प्रचार, भाजपअंतर्गत विरोधाने उशिरा मिळालेल्या उमेदवारीवर मात करत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे वसंत गिते यांचा १७ हजार ८३५ मतांनी पराभव केला. या मतदारसंघात पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेचे चित्र पूर्णपणे वेगळे होते. लोकसभा निवडणुकीत ठराविक मतदानकेंद्रांवर महाविकास आघाडीला जे एकगठ्ठा मतदान झाले होते तो ट्रेंड यावेळी चाललेला दिसला नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 4000 हजार मतांची आघाडी घेतली होती. त्यावेळी 1 लाख 86 हजार 422 इतके मतदान झाले होते. या निवडणुकीत 1 लाख 99 हजार मतदारांनी मतदान केले मात्र लोकसभेपेक्षा यावेळी चित्र खूपच वेगळे दिसले त्याचबरोबर वाढलेल्या मतांचा टक्का महाविकास आघाडीच्या यशाला धक्का देणारा ठरला आणि देवयानी फरांदे यांनी हॅट्रिक केली. यामध्ये देवयानी फरांदे या सलग दोनदा आमदार राहिल्याने सर्वच समाजाबरोबर त्यांचा संपर्क कायम होता त्याचबरोबर मतदारसंघात त्यांनी केलेली कामे ही त्यांची जमेची बाजू ठरली त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या सभा फायदेशीर ठरल्या त्याचबरोबर हिंदुत्व आणि लाडक्या बहिणी या मोठ्याप्रमाणात देवयानी फरांदे यांच्यामागे उभ्या राहिल्या. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांच्या मागे असलेली जुन्या कार्यकर्त्यांची फळी कुठेही प्रचारात दिसली नाही. महाविकास आघाडीने एकत्रित व संघटिरित्या कुठेही काम दिसले नाही. मोजक्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवणे भोवले. पराभूत उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते– वसंत गीते (ठाकरे गटाची शिवसेना) 87,151, रवींद्र औटे (बसपा) 900 नीतीन रेवगडे (निर्भय पार्टी) 435 मुशीर सय्यद (वंचित बहुजन) 3062 अवंतीका घोडके (अपक्ष) 104 प्रकाश कांजोळे (अपक्ष) 163 राजू सोनवणे (अपक्ष) 96 वसीम शेख (अपक्ष) 477 सचिनराजे देवरे (अपक्ष) 195 नोटा — 1,644

Loading

Previous Post

अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच…”, राज ठाकरे यांची प्रतिक्रिया

Next Post

भाजपचे धक्कातंत्र,अजित पवार मुख्यमंत्री ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White