
नेत्यांच्या सभांनी नाशिक जिल्हा दणाणला
आज नाशिक जिल्हा सभांनी गाजला प्रचाराला अवघे काही दिवस शिल्लक असताना नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. तर संध्याकाळी नाशिक शहरात उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या दोघेही सभांना नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ भारती पवार आणि नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत येथे सभा पार पडली. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले काँग्रेसमध्ये, नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादी विलीन होणे निश्चित आहे. मात्र यामध्ये ज्यावेळी नकली शिवसेना विलीन होईल. त्यावेळी मला सर्वात जास्त आठवण बाळासाहेब ठाकरे यांची येईल बाळासाहेब म्हणाले होते की ज्यावेळी शिवसेनेची काँग्रेस होईल त्यावेळी माझ शिवसेनेचे दुकान बंद करून टाकेल. मात्र त्यांच्या या स्वप्नांचा नकली शिवसेनेने चुराडा केला आहे. बाळासाहेबांचे स्वप्न होते की अयोध्येत राम मंदिर व्हावे ,जन्म काश्मीर वरून 370 कलम हटवावे, त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. परंतु याची सर्वात जास्त चिड़ नकली शिवसेनेला येत आहे. आम्ही दिलेले राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण नकली शिवसेनेने व काँग्रेसने नाकारले मात्र आता राम मंदिर उभे राहिले तरी काँग्रेस राम मंदिराबाबत वेगवेगळ्या गोष्टी करत आहे. त्याच काँग्रेसला उरावर घेऊन नकली शिवसेना नाचत आहे असे मोदी म्हणाले. त्याचबरोबर जी काँग्रेस सावरकर यांच्या विरोधात बोलते त्या काँग्रेस सोबत नकली शिवसेना असून त्यांनी काँग्रेस समोर गुडघे टेकले आहेत. पहिल्या चार टप्प्यातील निवडणुकांमध्ये नकली शिवसेना चारी मुंड्या चीत झाली आहे. आज मोदी सरकार गरिबांना मोफत धान्य आणि पक्के घर देत आहे गरीब कुटुंबांना उज्वला गॅस देत आहे, हे देताना आम्ही कधीही कोणाचा धर्म आणि जात पाहिली नाही. माझे पूर्ण जीवन गरीब शेतकरी आणि महिलांच्या विकासासाठी आहे. असे ते म्हणाले, यादरम्यान शेतकऱ्याने कांद्याच्या प्रश्नावरून घोषणाबाजी केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी भाष्य केले ते म्हणाले की आमच्या सरकारने पहिल्यांदा कांद्याचा अतिरिक्त साठा करण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही गेल्या हंगामात सात लाख मॅट्रिक टन कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी केला आहे. त्यानंतर आता आमचे सरकार पुन्हा पाच लाख मॅट्रिक टन कांदा साठा करण्याच्या तयारीत आहे. आमच्या सरकारच्या काळात प्रति 35 टक्क्यांनी कांदा निर्यात वाढली आहे. तर गेल्या दहा दिवसात आम्ही 7 हजार मेट्रिक टन कांदा खरेदी केला आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तर इकडे महाआघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ बोलताना नाशिकच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपा ,पंतप्रधान मोदी व अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. 4 जून नंतर मोदी हे पंतप्रधान नसणार कारण त्यांच्या पक्षाचा सुफडा साफ होणार आहे. ते झोळी घेऊन निघून जातील मग भाजपाची अवस्था काय होणार ? त्यावेळी त्या सर्व संस्था आमच्या ताब्यात असतील मग बघतोच एका-एकाकडे, 30 वर्षात भाजपा सोबत राहून दगाफटका झाला पण भाजपात गेलो नाही तर कॉग्रेस मध्ये कसा जाणार, 2 लुटारूनी माझ्या महाराष्ट्राचे वैभव लुटले आहे. ते मी परत मिळवणार, 4 जूनला निकाल लागेल आणि 5 जूनला अर्धा भाजपा फुटणार अशी भविष्यवाणी देखील उद्धव ठाकरे यांनी केली. बाळासाहेबांचं नाव घेताना त्यांना हिंदू हृदयसम्राट म्हणा असं देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सुनावलं.

![]()











