मुख्यमंत्री शिंदे आणि गोडसे यांच्या एकाच गाडीतील प्रवासामुळे चित्र बदलणार का ?

नाशिक : लोकसभा मतदारसंघ हा महायुतीत कोणत्या पक्षाकडे राहतो आणि उमेदवार कोण असणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. उद्या होणाऱ्या महायुतीच्या पत्रकार परिषदेत याची घोषणा होणार आहे. मात्र काही वर्षांपूर्वी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे नाशिक आता गरम होऊ लागले आहे.तसाच राजकिय पारा देखील चढू लागला आहे नाशिक लोकसभेत शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व होते, खा हेमंत गोडसे दुसऱ्यांदा खासदार झालेत ते धनुष्य-बाण चिन्हावर, नंतर राजकारण बदलले शिवसेनेचे शिंदे गट, ठाकरे गट असे दोन गट पडले यापैकी खासदार हेमंत गोडसे शिंदे गटात गेले. मात्र अचानकपणे अजित पवार गट (उशिरा) मात्र महायुतीला जोडला गेला आणि प्रत्येक जागेवर संघर्ष सुरु झाला . या संघर्षात हेमंत गोडसे यांना खूप मेहनत घ्यावी लागली यादरम्यान नाशिकचे दबंग नेतृत्व छगन भुजबळ पुन्हा एकदा समोर उभे टाकले. मग गोडसे यांना शक्तिप्रदर्शन करावे लागले, अनेकदा मुख्यमंत्री शिंदेंची भेट घ्यावी लागली ती भेट झाली किंवा कधी टळली, यादरम्यान पक्षातीलच चेहरे उमेदवारीसाठी पुढे आले. मात्र गोडसे खचले नाहीत,त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले, आणि परवा एकाच गाडीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हेमंत गोडसे यांचा प्रवास झाला, आणि हा प्रवास निश्चितच हेमंत गोडसे यांच्यासाठी लाभदायक ठरू शकतो. छगन भुजबळ यांना होणारा विरोध बघता व सिन्नरचे बदलते राजकीय समीकरण लक्षात घेता सूत्रांच्या माहितीनुसार नाशिक लोकसभेची माळ शिंदे गटाच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे.
![]()











