खा हेमंत गोडसे यांच्या सून भक्ती गोडसे व शेफाली भुजबळ यांची नावे चर्चेत

नासिक : लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून अजूनही उमेदवार घोषित झालेला नाही निवडणुका घोषित झाल्यानंतर 40 दिवसांचा कालावधी उलटला आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित होऊन महिना झाला परंतु अद्यापही नाशिकच्या जागेचा फैसला झालेला नाही यामुळे उमेदवारी महायुतीतील कोणत्या पक्षाला, कोणत्या उमेदवाराला मिळणार याबाबत इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे . मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेऊन बरेच दिवस उलटून गेले तरी देखील उमेदवार घोषित होऊ शकलेला नाही, माघारीनंतर छगन भुजबळ यांनी आपली चाल कायम ठेवली असून माघार आपण घेतली असून पक्षाचा दावा मात्र कायम असल्याचे सांगितले त्याचबरोबर भुजबळ यांनी आमच्याकडे उमेदवारांची कमी नसल्याचे सांगत मा. खा देविदास पिगळे, माणिकराव कोकाटे, महिला आघाडीच्या बलकवडे आदींचे नाव घेत संभ्रम कायम ठेवला.तर दुसरीकडे भुजबळांचे समर्थक दिलीप खैरे यांनी देखील उमेदवारी अर्ज घेतला. त्यातच माणिकराव कोकाटे यांचे नाव आल्याने त्यांनी देखील मी इच्छुक नाही मात्र पक्षाने जबाबदारी दिल्यास मी पार पाडेलच म्हणत गोंधळात भर घातली. तर इकडे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात नाशिक लोकसभा मतदार संघ शिवसेनेचाच आहे ,मुख्यमंत्री बोलत असताना सुद्धा महायुतीतील मित्र पक्षांकडून रोज नवनवीन नावे समोर येत असल्याने महायुतीतच अलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे. त्यात शिंदे गटात एकवाक्यता नसल्याचे दिसून आले गोडसे यांची उमेदवारी निश्चित असताना अजय बोरस्ते यांचे नाव समोर आले यामुळे शिंदे गटातच गोधळ वाढला मात्र आता बोरस्ते यांनी माघार घेतल्याचे समजते. तर दुसरीकडे 2 दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे गटाचे नाराज असलेले विजय करंजकर यांनी शिर्डी विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्याचबरोबर खा. हेमंत गोडसे यांचे पुत्र अजिंक्य गोडसे, व सून भक्ती गोडसे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली या भेटीगाठींत भर म्हणून शिंदे गटाचे अजय बोरस्ते यांनी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांची भेट घेतली त्यातल्या-त्यात अनिकेतशास्त्री यांनीही भाजपकडून नाशिक लोकसभेवर दावा सांगितला आहे.या सर्व घडामोडी बघता महायुतीत नेमकं काय चाललं आहे या संभ्रमात महायुतीतील तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्यांची ,इच्छुकांची घालमेल बघता व प्रचारासाठी मोजके दिवस असल्यामुळे पालकमंत्री दादा भुसे, तसेच भाजपा नेते गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत नाशिकचा उमेदवार तातडीने घोषित करण्याची मागणी केली. तर महायुतीतील मित्र पक्षच एकमेकांवर कुरघोडी करत असल्याचे दिसत आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ४00 चा नारा पूर्ण करायचा असताना दुसरीकडे मात्र महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. दावे प्रतिदावे आरोप, प्रत्यारोप कोणतेही आधार नसलेली नावं अचानक चर्चेला येणे आणि सांशकतेचे वातावरण तयार होणं हे या लोकसभा निवडणुकीसाठी चांगले नाही अशा शब्दात टीका करत भाजपचे इच्छुक उमेदवार दिनकर पाटील यांनी महायुतीला घरचा आहार दिला आहे. कधी नाही इतका गोधळ यावेळी नाशिक लोकसभेसाठी दिसत असल्याने .मतदार देखील रोज होणाऱ्या घटना,बदलते उमेदवार बघून काहीसे नाराज झाल्याचे चित्र आहे. त्यातच महायुतीच्या गोटात नवीन चर्चेला उत आला असून नाशिक लोकसभा मतदार संघात महायुतीकडून महिला उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू असून. मतदानातील महिलांचा टक्का व इतर उमेदवारांनमध्ये होणारी रस्सीखेच बघता महिला उमेदवार दिल्यास नाराजी राहणार नसल्याची चर्चा महायुतीच्या गोटात असून यासाठी शिंदे गटातून खा हेमंत गोडसे यांच्या सून भक्ती गोडसे यांचे नाव चर्चेत असल्याचे सूत्रांकडून समजते तर दुसरीकडे अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांच्या स्नुषा शेफाली भुजबळ यांचे देखील नाव उमेदवार म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. रोज नवनवीन नावे ,आज किंवा उद्या उमेदवारी घोषित होणार ? मात्र उमेदवारी निश्चित होत नसल्याने व वेळ कमी असल्याने याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे

![]()











