• Latest
  • Trending
नाशिकमध्ये मुसळधार पावसाचं तांडव! अर्धवट खोदकामामुळे परिस्थिती अधिक बिकट

नाशिकमध्ये मुसळधार पावसाचं तांडव! अर्धवट खोदकामामुळे परिस्थिती अधिक बिकट

July 8, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकमध्ये मुसळधार पावसाचं तांडव! अर्धवट खोदकामामुळे परिस्थिती अधिक बिकट

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

महापालिकेच्या मुख्यालयासह शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरले

नाशिक : त्रंबकेश्वर आणि नाशिक परिसरात हवामान खात्याने ढगफुटीचा अंदाज वर्तवला होता मात्र हा संभाव्य धोका टळल्यानंतर काल रात्रीपासून मुसळधार पावसाने नाशिक शहराला अक्षरशः झोडपून काढले. या मुसळधार पावसामुळे संपूर्ण नाशिक शहर जलमय झाले असून, गोदावरी नदीला यंदाच्या हंगामातील पहिला मोठा पूर आला आहे. नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, पुराचे पाणी रामकुंड परिसरातील प्रसिद्ध ‘दुतोंड्या मारुती’च्या छातीपर्यंत पोहोचले. गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने रामकुंड परिसरातील बहुतांश घाट पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. पुराची पातळी मोजण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या मूर्तीच्या छातीपर्यंत पाणी आल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. नदीकाठच्या परिसरामध्ये आता पूरस्थिती निर्माण झाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.नाशिकमध्ये 24 तासात 120 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील देखील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे.त्याचबरोबर सिंहस्थ कामासाठी तपोवन परिसरात सुरू असलेल्या कामासाठी उभारण्यात आलेले शेडचे ऑफिस वाहून गेले.नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पुराचा फटका सिंहस्थ कामांना देखील बसला आहे.नवीन पुलांचे काम सुरू असलेल्या ठिकाणचे साहित्य वाहून गेले आहे.पूरस्थितीमुळे शहरातून वाहणाऱ्या नंदिनी नदीवरील अनेक पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले.रात्रभर कोसळलेल्या या पावसामुळे अनेक निवासी भाग आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत. नंदिनी नदीला पूर आल्याने नदीवरील काही पूल पाण्याखाली गेले असून, अनेक दुकानांमध्ये आणि इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले आहे. यापूर्वीही नाशिकला अतिवृष्टीचा फटका बसला आहे, मात्र यंदा शहरात सुरू असलेल्या अर्धवट खोदकामामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली. रस्ते खचल्याने आणि अनेक ठिकाणी एकेरी मार्गावरूनच दुहेरी वाहतूक सुरू असल्याने पादचारी व वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे.सखल भागातील अनेक वस्त्यांमध्ये आणि घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचल्याने रस्त्यांना अक्षरशः नदीचे स्वरूप आले आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्याने आणि रस्ते खचल्याने अनेक छोटी-मोठी वाहने खड्ड्यांमध्ये आणि खचलेल्या भागात अडकून पडली आहेत.चोपडा लॉन परिसरात स्कूल व्हॅन आणि महापालिकेची घंटा गाडी पाण्यात अडकली असल्याचं दिसत आहे.नाशिक त्रंबकेश्वर रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. पिंपळगाव बहुला या ठिकाणी मुसळधार पावसामुळे रस्ता वाहून गेला आहे. नाल्यावर बांधलेला छोटेखानी पुलाचे काम नित्कृष्ट असल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला आहे.नाशिकच्या नंदिनी नदीच्या पाण्यात वाढ झाल्यानं भाभानगर, पखाल रोड, भागातील पूल बंद करण्यात आला आहे.त्याचबरोबर अशोका मार्ग परिसरात मोठ्याप्रमाणात पाणी साचल्याने विद्यार्थी व पालकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याची घटना देखील समोर आली आहे.मिलिंद नगर परिसरात घरांमध्ये पाणी घुसलं आहे. महापालिकेच्या मुख्यालयासह शहरातील सखल भागात पुराचे पाणी शिरले आहे.नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात झालेल्या मुसळधार पावसानंतर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागाचा प्रत्यक्ष पाहणी दौरा केला

Loading

Previous Post

नाशकात ढगफुटीच्या इशाऱ्यावर राजकीय वाद पेटला

Next Post

संतापजनक ! कायद्याच्या बालेकिल्ल्यात पर्यटक कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White