• Latest
  • Trending
नाशिकमध्ये खड्डे बुजविण्यासाठी आलेला डंपरच खड्ड्यात

नाशिकमध्ये खड्डे बुजविण्यासाठी आलेला डंपरच खड्ड्यात

August 21, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकमध्ये खड्डे बुजविण्यासाठी आलेला डंपरच खड्ड्यात

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

डंपर ज्या ठिकाणी उभा होता तिथला रस्ता थेट 10 ते 12 फुट खोल खाली खचला.

नाशिक : शहरात पुढच्यावर्षी सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. या विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. रस्ते, पाणी पुरवठा, मलनिस्सारण, वीज तसेच पायाभूत सुविधांचे काम एकाचवेळी सुरु आहे. यादरम्यान नाशिकमधील रस्त्यांंवरील खड्ड्यांचा प्रश्न राज्यभर अगोदरच चर्चेत आहे. या खड्ड्यांमुळे नाशिक शहरातील पाच नागरिकांचे बळी गेल्याने नाशिककरांमध्ये संतापाचे वातावरण असतानाच त्यात भर घालणारी घटना समोर आली आहे. गंगापूर रोडवर नवश्या गणपती परिसरात हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक खडीने भरलेला डंपर खडी उतरवत असताना धक्कादायक प्रकार घडला. डंपर ज्या ठिकाणी उभा होता तिथला रस्ता थेट 10 ते 12 फुट खोल खाली खचला. यामुळे हा डंपर या दहा ते बारा फुटांच्या खड्ड्यात अडकला. आजच्या या घटनेनं रस्त्याच्या कामाच्या दर्जावर आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच या घटनेत सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र या घटनेमुळे शहरातील रस्त्यांचे कामे आणि खड्डे यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून 80 टक्के खड्डे बुजवल्याचा आणि कामाची गुणवत्ता चांगला असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये ही घटना घडल्याने रस्त्याच्या कामाचा दर्जा काय आहे? असा प्रश्न उपस्थित होतोय. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. या घटनेत कुणाचा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण असतं? असा प्रश्न या निमित्ताने नागरिक उपस्थित करत आहेत.

Loading

Previous Post

‘मैत्रीत घात’ त्या महिलेचा अपघात नसून खून

Next Post

अवजड वाहनामुळे निष्पाप तरुणाचा गेला जीव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White