
नाशिक : आज रात्री 8 वाजेच्या दरम्यान नाशिक महागरपालिकेची(MH-15 GV 7842) सिटीलिंक बस नाशिकरोड येथून सीबीएसला निघाली असताना उपनगर परिसरात बस आल्यानंतर या बसमधून धूर निघू लागला व प्रचंड वास येऊ लागल्याने प्रवाशी प्रचंड घाबरले आणि बस उपनगर परिसरात थांबवत, घाबरलेले प्रवाशी बस मधून बाहेर पडले, बसमधून धूर येत असल्याने प्रवाशांना बसला आग लागल्याचे वाटले आणि बसमधून उतरलेल्या प्रवाश्यांनी मोठ्या प्रमाणात गोधळ घालण्यास सुरवात केली यादरम्यान बस चालक संतोष भवर व प्रवाशी यांच्यात वाद होऊन प्रकरण हमरीतुमरीवर आले .यादरम्यान दुसरी बस आल्यानंतर प्रवाशी बस मध्ये चढत असताना दुसऱ्या बसमध्ये आलेल्या इतर बस चालकांनी वाद उकरून काढत प्रवाश्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. मात्र यादरम्यान काही व्यक्तीनी मध्यस्थी करत वाद मिटवला व दुसरी बस मार्गस्थ झाली. यादरम्यान पोलीस व अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले त्यांनी बस पूर्णपणे चेक केली असता सिटीलिंक बसचे लायनर गरम झाल्याने धूर व वास येत असल्याचे त्यांनी न्युज ब्लँक अँड व्हाइट ला सांगितले. मात्र या घटनेमुळे सिटीलिंक बस मध्ये बसणाऱ्या प्रवाशांची सुरक्षा किती ? याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न परिसरातील नागरिक व प्रवाशी करताना दिसले.

![]()











