महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी, माकप सहभागी होण्याच्या हालचाली

नाशिक : निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर महायुती व महाआघाडी मध्ये युतीसाठी खलबते सुरु असताना नाशिकमध्ये मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत महाविकास आघाडी भक्कम पणे उभी असल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वीच मनसे आणि ठाकरे गटाची शिवसेना यांच्यात बैठक पार पडली मुख्य म्हणजे भाजप विरोधातील या लढ्यात अन्य पक्षांनी देखील सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते नाशिक महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. यासाठी स्थानिक पातळीवर मनसे, ठाकरे गटाची शिवसेना एकत्र आले असून अन्य पक्षांना देखील सोबत घेतले आहे. यादरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या वतीनेदेखील प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे समजते त्याचबरोबर डॉ डी एल कराड यांच्यासोबत देखील बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर कॉग्रेस,शरद पवार गटाची राष्ट्रवादी यांच्यासोबत देखील चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

![]()












