• Latest
  • Trending
नाशकात भाजपचं 100प्लसच स्वप्न भंगणार ?

नाशकात भाजपचं 100प्लसच स्वप्न भंगणार ?

December 21, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशकात भाजपचं 100प्लसच स्वप्न भंगणार ?

YOU MAY ALSO LIKE

प्रभाग क्रमांक 23 भाजपच्या बालेकिल्ल्यात आता ठाकरे गटाची लढाई

नाशकात अनेक ठिकाणी दोन मित्रांमध्येच कुस्ती

महायुती होण्याची शक्यता शिंदे गटाला 32 जागा तर राष्ट्रवादीला देखील क्षमतेनुसार जागा सोडण्याची भाजपची तयारी- सूत्र

नाशिक : सुरवातीच्या काळात महापालिका निवडणुकीसाठी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी 100 प्लसचा नारा दिला होता. त्यानंतर या घोषणेने नाराज झालेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेनेदेखील स्वबळाची भाषा सुरू केली होती तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने या सर्वांपासून लांब रहाणे पसंत केले होते. मात्र ठाकरेंच्या होणाऱ्या युतीमुळे बहुदा भाजप पुन्हा जमिनीवर आल्याचे चित्र आहे. याचे उदाहरण म्हणजे भाजपच्या निवडणूक प्रमुख आमदार देवयानी फरांदे यांनी देखील स्वबळाचे संकेत दिले मात्र याला खोडून काढत मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीवर भर दिला. याला कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला सोबत घेण्याच्या सूचना केल्या तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील भाजप सोबतच निवडणूक लढविण्याच्या सूचना केल्यानंतर मंत्री,पदाधिकारी, कामाला लागले. त्यानंतर भाजपचे मंत्री गिरीश महाजन, शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी खा. समीर भुजबळ यांच्यात बैठक झाल्याची माहिती समोर येत असून ही बैठक एका मोठ्या हॉटेलमध्ये झाल्याची माहिती मिळत आहे. यादरम्यान शिंदे गटाच्या शिवसेनेने 45 जागा मागितल्या असून सूत्रांच्या माहितीनुसार भाजपने 32 जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने देखील 30 जागांवर दावा सांगितलला आहे. मात्र पक्षाच्या क्षमतेनुसार जागा सोडणार असल्याचे समजते. त्यानंतर स्थानिक पातळीवर कोअर कमिटीच्या बैठका घेऊन चर्चा करण्यास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितल्याचे समजते. सोमवारी बऱ्यापैकी जागावाटपाचे चित्र स्पष्ट होणार असल्याचे समजते. या झालेल्या चर्चेत आमदार सुहास कांदे माजी खासदार हेमंत गोडसे अजय बोरस्ते विजय करंजकर शहराध्यक्ष प्रवीण तिदमे उपस्थिती असल्याची माहिती मिळत असून राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शहराध्यक्ष रंजन ठाकरे हे उपस्थित असल्याचे समजते.मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वेगवेगळ्या बैठका झाल्याची माहिती मिळत आहे.

Loading

Previous Post

नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा धुव्वा तर महायुती सुसाट

Next Post

भाऊ,पाच मिनिटे तरी आम्हाला द्या…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White