“तडीपार” केलेल्या युवकांमध्ये हाणामारी नंतर खून

नाशिक : शहरात कायद्याचा धाक संपला असून एकामागून एक खुनाच्या घटना घडत असल्याने नाशिक शहराची ओळख आता “क्राईम सिटी” म्हणून होऊ लागली आहे. दिवसाला होणाऱ्या हत्या यामुळे शहरात गँगवार सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. जेलरोड परिसरात असलेल्या मोरे मळ्यात दोन युवकांमध्ये जोरदार हाणामारी झाल्यानंतर यामध्ये एकाची हत्या करण्यात आली.तर त्याच्यासोबत असलेला युवक जखमी झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार हितेश डोईफोडे रा महाजन हॉस्पिटलमागे जेलरोड) व निलेश पेखळे( रा. मोरे मळा बालाजी नगर) हे दोघे मित्र आहेत. कामानिमित्त निलेश पेखळे याला भेटण्यासाठी हितेश डोईफोडे व त्याचा मित्र बंटी बांग याला घेऊन मोरे मळा परिसरात गेला. यादरम्यान हितेश डोईफोडे व निलेश पेखळे यांच्यामध्ये अचानक वाद सुरू झाले.यामध्ये झटापटी व हाणामारी सुरू झाली यादरम्यान निलेश पेखळे याने धारदार शस्त्राने व लोखंडी रॉडने हितेशच्या डोक्यात प्रहार केले.यावेळी बरोबर असलेला हितेशचा मित्र बंटी बांग याला देखील मारहाण करण्यात आली . जखमी बंटीने मदतीसाठी स्वतःच्या भावाला कॉल करून बोलावून घेतले व उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल झाला तर इकडे जखमी अवस्थेत असलेल्या हितेशला निलेश यानेच आपल्या चारचाकी गाडीतून जिल्हा रुग्णालयात नेले.मात्र रितेशचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर निलेशने तेथून पळ काढत थेट नाशिकरोड पोलीस स्टेशन गाठत गुन्ह्याची कबुली देत स्वतःला पोलिसांच्या हवाली केले.मिळालेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार हितेश डोईफोडे आणि निलेश पेखळे या दोघा युवकांना तडीपार करण्यात आले होते.मात्र अवैध धंद्याच्या पैशातूनच या दोघांमध्ये वाद झाल्याची चर्चा परिसरात आहे याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहे.

![]()












