• Latest
  • Trending
त्या खुनामागे एम डी ड्रग्स विक्रीची स्पर्धा आणि वर्चस्ववाद

त्या खुनामागे एम डी ड्रग्स विक्रीची स्पर्धा आणि वर्चस्ववाद

August 18, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

त्या खुनामागे एम डी ड्रग्स विक्रीची स्पर्धा आणि वर्चस्ववाद

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

खून प्रकरणात ड्रग्समाफिया अर्जुन पिवाल याच्यासह दहा संशयित ताब्यात

नाशिक  :  नाशिकरोड परिसरातील जुन्या बिटको  रुग्णालयाशेजारी गोसावी वाडीच्या मुख्य चौकात एका पान टपरीवर उभा असलेल्या सुमित अरुण पगारे(32, रा. पगारे चाळ) याच्यावर दुचाकीने आलेल्या दोघांपैकी एकाने रविवारी सायंकाळी गोळ्या झाडल्या. दोन गोळ्या त्याच्या पोटात शिरल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यास तातडीने जवळच्या रुग्णाला दाखल केले असता तेथे उपचार सुरू असताना काही वेळेतच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या खून प्रकरणात नाशिक रोड पोलिसांनी एकूण 14 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी ड्रग्स माफिया अर्जुन पीवाल याच्यासह दहा संशयित आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तिघा फरारी आरोपींचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सुमित अरुण पगारे, सुमित श्याम भाटिया, आकाश बोर्डे हे पानपट्टी जवळ पान मसाला खरेदी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी वर्चस्ववादातून संशयित अर्जुन सुरेश पिवाल, शिवा सुरेश पिवाल,मन्ना भरत गांगुर्डे, राजीक शेख, राहुल सोनवणे, निशांत भारती, शाहिद शेख, आयुष भारती, अक्षय गोसावी, राजवीर गांगुर्डे, आशिष पिवळ, साद पठाण, अमोल वाघ, पराग मिलिंद कुलकर्णी, हे सुमित पगारे व इतरांवर धावून आले. त्यांनी शिवीगाळ करत राजिक शेख याने सुमित पगारे यास आपल्यात काय असेल ते मिटवून टाकू असे बोलून हातात हात मिळविण्याच्या बहाण्याने राजीक याने त्याच्या कमरेला लावलेली बंदूक काढून सुमितच्या पोटावर दोन गोळ्या झाडल्या यामध्ये सुमित हा जागीच कोसळल्यानंतर संशयित आरोपी हे लागली दुचाकी वर पळून गेले. सुमितला तातडीने रुग्णाला उपचारासाठी नेले असता त्याची प्राणज्योत मालवली. या दरम्यान नाशिक रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक व युनिट दोनच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणाहून 11 संशोधना ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे  खुनामागे ड्रग्स विक्रीची स्पर्धा वर्चस्ववादावरून सुमितची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले असले तरी त्याच्यासोबत बळकवलेली जागा, वडिलांकडून घेतलेले उसनवारीचे पैसे परत दिले नाही व तसेच एमडी ड्रग्स विक्रीची स्पर्धा असे कारणे खुणा मागे असल्याच समोर येत आहे. यानुसार पोलिसांकडून संशयित आरोपींची धरपकड केली जात आहे त्याचबरोबर 18 ऑक्टोंबर 2023 साली सोलापुरातून थेट नाशिकला एमडी ड्रग्स सप्लाय केल्या प्रकरणी मास्टरमाइंड सनी पगारे, अर्जुन पिवळ व सुमित पगारे या तिघांना अटक केली होती. काही महिन्यांपूर्वी सुमित कारागृहातून जामीनावर सुटला होता. असे पोलिसांनी सांगितले आठवडाभऱ्यापूर्वीच सुमितच्या वाहन खरेदी-विक्रीच्या दुकानावर शशास्त्राचा धाक दाखवून संशयित आरोपींनी खंडणीसाठी धमकावले होते. यानंतर सुमितने फिर्याद दिल्याने नाशिक रोड पोलिसांनी संशयित राहुल सोनवणे यांच्या विरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता

Loading

Previous Post

जामनेरचा ‘खड्डे महाकाल’ बाहेर काढा, तरच नाशिककरांचे भवितव्य सुधारेल 

Next Post

‘मैत्रीत घात’ त्या महिलेचा अपघात नसून खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White