• Latest
  • Trending

डॉ बच्छाव यांना कॉग्रेसची उमेदवारी धुळ्यात, जल्लोष मात्र नाशकात,धुळ्यात राजीनामा सत्र सुरू….

April 11, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

डॉ बच्छाव यांना कॉग्रेसची उमेदवारी धुळ्यात, जल्लोष मात्र नाशकात,धुळ्यात राजीनामा सत्र सुरू….

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

धुळ्यातील कॉग्रेस पदाधिकारी म्हणतात बाहेरील आयात उमेदवार नको….

नाशिक : धुळे लोकसभा मतदारसंघात महायुतीचे डॉ. सुभाष भामरे यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पक्षाने धुळ्यात मोठी खेळी करत नाशिकच्या डॉ. शोभा बच्छाव यांना काँग्रेस तर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली.त्यामुळे धुळे मतदारसंघात दोन डॉक्टरांमध्ये लढत रंगणार आहे. मात्र बाहेरील उमेदवार का आयात केला म्हणत धुळ्यातील कॉग्रेसमधील नाराजीनाट्य उपाळून आल्याचे चित्र आहे .धुळे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यात नाशिक जिल्ह्यातील बागलाण तसेच मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य असे तीन विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. डॉक्टर शोभा बच्छाव या देवळा तालुक्यातील पिंपळगाव वाखरी येथील रहिवासी असून त्यांची सासुरवाडी मालेगाव ब्रह्मा मधील सोनज येथील असल्याने त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. नाशिक जिल्ह्यातील मतदार संघाचा विचार केल्यास तीन मतदारसंघाची साथ काँग्रेस उमेदवाराला मिळू शकेल अशी राजकीय समीकरणे असल्याने माजी राज्यमंत्री डॉ शोभा बच्छाव यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली गेली असल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर डॉक्टर शोभा बच्छाव यांचे वडील धुळ्यात शासकीय नोकरीला असल्याने त्यांचे प्राथमिक शिक्षण धुळ्यात झालेले आहे. डॉ बच्छाव या सण २००९ मध्ये धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्री होत्या. सध्या धुळे जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी आहेत डॉक्टर शोभा बच्छाव यांनी नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षाची जबाबदारी सांभाळली आहे मात्र डॉ शोभा बच्छाव यांना काँग्रेस तर्फे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बाहेरील उमेदवार का आयात केला ? असे म्हणत धुळे काँग्रेसमध्ये राजीनामा नाट्य सुरू झाल्याचे समजते. यामध्ये नाशिक ग्रामीण जिल्हाध्यक्ष तुषार शेळके व धुळे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष श्याम सनेर यांनी राजीनामा दिला असून आम्हाला विश्वास न घेता नाशिक मधून उमेदवार आयात केला गेल्याचे म्हणत त्यांनी राजीनामा दिला असून येत्या दोन दिवसात भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे धुळ्यातील बंडखोरी कॉग्रेस शमवण्यात कॉग्रेसला कितपत यश मिळते हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Loading

Previous Post

चिन्हावर कॉम्प्रमाईज नाहीच”मनसेच”ठरलं लोकसभा लढणार नाही मात्र भाजपा महायुतीला बिनशर्त पाठींबा,विधानसभेची तयारी …..

Next Post

नाशिक लोकसभेचा तिढा सुटला, उद्या होणार घोषणा कोण असणार उमेदवार..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White