• Latest
  • Trending

चिन्हावर कॉम्प्रमाईज नाहीच”मनसेच”ठरलं लोकसभा लढणार नाही मात्र भाजपा महायुतीला बिनशर्त पाठींबा,विधानसभेची तयारी …..

April 9, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

चिन्हावर कॉम्प्रमाईज नाहीच”मनसेच”ठरलं लोकसभा लढणार नाही मात्र भाजपा महायुतीला बिनशर्त पाठींबा,विधानसभेची तयारी …..

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

मी जे “मनसे” नावच अपत्य जन्माला घातलं त्याचाच मी अध्यक्ष राहणार-राज ठाकरे

नाशिक :ब्लॅक अँड वाइट  न्यूजचा प्रश्न खरा ठरला मनसे लोकसभा लढवणार की विधानसभा ? आज शिवाजी पार्क परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसेच्या हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. यावेळी सुरुवातीलाच बोलताना राज ठाकरे म्हणाले म्हणाले की महानगरपालिकेच्या निवडणुका आज होणार,आज होणार  मात्र  अजूनही झाल्या नाहीत मात्र लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यादरम्यान निवडणूक आयोगाला राज ठाकरे यांनी खडे बोल सुनावले. डॉक्टर आणि नर्सेस यांना निवडणुकीच्या कामात का गुंतवले गेले. रुग्णालय सोडून डॉक्टर मतदारांची नाडी मोजणार आहेत की नर्सेस डायपर बदलणार आहेत. दर पाच वर्षांनी निवडणूक होते हे निवडणूक आयोगाला चांगले माहीत असताना, आधीच निवडणुकीसाठी फळी का उभारली जात नाही. ऐन वेळेस कधी शिक्षक, डॉक्टर, नर्सेस, यांना निवडणुकांचे काम दिले जाते रुग्णसेवा सोडून त्यांनी हे काम करायचे का असा सवाल राज ठाकरे यांनी केला त्याबरोबर कुणीही कामावर जाऊ नका तुम्हाला नोकरीवरून कोण काढतो तेच मी बघतो असा सज्जड इशाराही राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिला.यावेळी उलट-सुलट बातम्या लावणाऱ्या पत्रकारांचा समाचार घेताना राज म्हणाले मला शिवसेना प्रमुख व्हायचे असते तर कधीच झालो असतो.32 आमदार 5 खासदार बाहेर उभे होते मात्र पक्ष फोडणे व दुसऱ्याच्या हाताखाली काम करणे मला मान्य नव्हते.मी फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्याच हाताखाली काम केलं आहे. म्हणून मी माझे स्वताचे अपत्य जन्माला घातले ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आज 18 वर्षाच झालं आहे . आणि त्या अपत्याचाच मी अध्यक्ष कायम असणार आहे. जागावाटपाची चर्चा झाली  ते म्हणाले आमच्या चिन्हावर निवडणुका लढावा , मी एक सांगतो हे रेल्वे इंजिन हे चिन्ह आपल्या सर्वांच्या कष्टाने आले आहे. कोणासारखे आयते ,सहज आले नाही. चिन्हावर कॉम्प्रमाईज नाहीच, मी दिल्लीला गेलो यात नवीन काय, काही वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे देखील इंदिरा गांधी,संजय गांधी यांना भेटायला दिल्लीला गेले होते. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत हे बोलणारा मी पहिला व्यक्ती, आणि काही गोष्टी पटल्या नाहीत ,त्या नाही पटल्या,म्हणून विरोध करणारा देखील मीच, मी टोकाचा विरोध करणारा व टोकाचे प्रेम करणार आहे. लाव रे व्हिडीओ देखील माझाच आणि 370 कलम रद्द केल्यानंतर अभिनंदन करणारा मी, मला मुख्यमंत्री पद भेटल नाही म्हणून मी विरोधात बोललो होतो का ? ,मला भूमिका पटली नाही म्हणून मी विरोध केला. आज हे विरोधात बोलताहेत मग मी ज्यावेळी विरोधात बोलत होतो. त्यावेळी खिशातले राजीनामे बाहेर काढून माझ्याबरोबर का नाही आलात. त्यावेळी सत्तेत मिळणारा मलिदा चाटत बसले होते. तुमचा पक्ष फुटला, तुम्हाला बाहेर काढले म्हणून विरोध करता आहात का, पण व्यक्तिगत टीका मी कधीही केली नाही.मी बाळासाहेब यांच्या बरोबर असताना भाजपा नेत्यांबरोबर माझे संबंध आलेत यामध्ये गोपीनाथ मुंडे नितीन गडकरी प्रमोद महाजन यांच्याबरोबरचे माझे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे होते काँग्रेस बरोबर माझे तसे कधी संबंध नव्हते. भेटी होत्या पु ल देशपांडे म्हणायचे त्याप्रमाणे गाठी पडल्या त्या भाजपावाल्यांबरोबर मी गुजरातला गेलो गुजरातला मध्ये चाललेलेे डेव्हलपमेंट बघितले पण ते महाराष्ट्रापेक्षा कमीच,आज या जगात सर्वात तरुण देश म्हणजे भारत आहे, या देशात तरुण मोठ्याप्रमाणात आहे, माझी मोदीनकडून अपेक्षा आहे. भारतातल्या तरुणांकडे लक्ष द्या, या देशातील अनेक उद्योजक देश सोडून गेले याकडेही लक्ष द्या, ही लोकसभा देशाचे भवितव्य ठरवणार आहे. आपण या महाराष्ट्राला योग्य मार्ग दाखवू मात्र मला महाराष्ट्राकडून अपेक्षा आहे कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका.मला वाटाघाटी नको मला राज्यसभा ही नको विधानपरिषद नको पण या देशाला खांबिर नेतृत्व हवं ,मला काही अपेक्षा नाहीत. मी फक्त नरेंद्र मोदींसाठी महायुतीला पाठींबा देत आहे आणि महाराष्ट्र सैनिकांनी विधानसभेच्या तयारीला लागा असे आदेश कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी दिलेत

Loading

Previous Post

गुडीपाडवा मेळाव्यात “राज की बात” कळणार…लोकसभा लढणार की विधानसभा ?

Next Post

डॉ बच्छाव यांना कॉग्रेसची उमेदवारी धुळ्यात, जल्लोष मात्र नाशकात,धुळ्यात राजीनामा सत्र सुरू….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White