• Latest
  • Trending

जुन्या नाशकातील जनजीवन पूर्वपदावर,20 हुन अधिक ताब्यात

August 17, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

जुन्या नाशकातील जनजीवन पूर्वपदावर,20 हुन अधिक ताब्यात

YOU MAY ALSO LIKE

नाशकातील अमरधाम जवळ भल्या पहाटे भीषण अपघात

शाळा, महाविद्यालय परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवा;सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

जखमी पोलीस अधिकारी जमावात शिरल्याने परिस्थिती आली नियंत्रणात

नाशिक  :  राजकिय अस्थिरतेनंतर बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात काल सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक बंदचे आयोजन करण्यात आले होते. या बंदला दुकानदारांनी उस्फुर्त प्रतिसाद देत सकाळपासून दुकाने बंद ठेवली होती. मात्र दुपारनंतर या बंदला जुन्या नाशिक परिसरात हिंसक वळण लागले.जुन्या नाशकातील भद्रकाली परिसरात दुकाने सुरू असल्याचे समजल्यानंतर बंदचे आवाहन करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांचे वाद झाले. त्यानंतर दोन गट आमने-सामने आल्याने मोठ्या वादाला सुरवात झाली यावेळी एक जमाव हा भद्रकाली पोलीस ठाण्याच्या परिसरात जमा झाला होता. तर दुसरा जमाव हा साक्षी गणेश मंदिराजवळ जमा झाला होता. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत एकत्रित निवेदन दिले. तर दुसरीकडे तिवंधा चौकातून वर गेलेला जमाव व बडी दर्गा परिसरात असलेला जमाव  यांच्यात तुफान दगडफेक सुरू झाली. यावेळी दंगल नियंत्रण पथकावर देखील दगडफेक करण्यात आली यादरम्यान पोटाला मार लागल्याने जखमी झालेले पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी हे एका बाकड्यावर बसले होते. मात्र वाढता जमाव बघता ते हातात फायबरची संरक्षक ढाल व एका हातात काठी घेत थेट जमावात शिरले त्यामुळे उपस्थित असलेले पोलीस देखील त्यांच्या मागे धावले. यावेळी सौम्य लाठीमार करण्यात आला त्यावेळी जमाव पांगण्यास सुरुवात झाली. तर दुसरीकडे जमावाला पांगवताना पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या कानावर दगड लागला त्यामुळे मोठा रक्तस्राव झाला तरी देखील ते जमावाला शांत करण्यात व्यस्त होते. यावेळी पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडत थेट पोलीस जमावत घुसल्याने जमावावर नियंत्रण मिळवता आले. त्याचबरोबर वझरे चौक सारडा सर्कल, गंजमाळ, बागवानपुरा येथे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केल्याने इथून जमाव बाहेर पडू शकला नाही. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. त्याचबरोबर रात्री संपूर्ण जुन्या नाशकात पोलिसांनी खडा पहारा दिल्याने मोठा अनर्थ टळला. आज सकाळी पोलिसांनी रूट मार्च करत नागरिकांच्या मनातील भीती काढली. त्यामुळे आज जुन्या नाशिक परिसरातील जनजीवन पूर्वपदावर आल्याचे दिलासादायक चित्र पहावयास मिळाले. पोलिसांनी माहिती घेत सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरवात केली असून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, तसेच कायदा सुव्यवस्थेला आवाहन देणाऱ्यांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून आतापर्यंत पंधरा ते वीस जणांना अटक केल्याची माहिती मिळते आहे.त्याच बरोबर दोन्ही गटातील दंगलखोरांचा शोध सुरू आहे. दगडफेकीत पाच पोलीस अधिकारी व नऊ कर्मचारी जखमी झाली असून सर्वांची प्रकृती ठिक आहे. या सर्वांची भेट पालकमंत्री दादा भुसे यांनी घेतली असून पोलिसांनी अतिशय संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळल्याचे पालकमंत्री दादा भुसे म्हणाले.पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात असून दंगलखोरांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे पोलीस आयुक्तांचा इशारा धुडगूस घालणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात येईल त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांची गय केली जाणार नाही. याबाबत तपास सुरू असून जे सहभागी असतील त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात येतील. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. परिस्थिती नियंत्रणात असून शांतता प्रस्थापित झाली आहे. कोणी अफवा पसरू नये व नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.

Loading

Previous Post

नाशकात सकल हिंदू समाजाच्या बंदला हिंसक वळण

Next Post

प्रत्येकवेळी बलात्कार आणि हत्या झाल्यानंतर देशाचा अंतरात्मा जागृत होतो -सुप्रीम कोर्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White