• Latest
  • Trending
कार्य गौरव पुरस्काराने प्रशांत जेजुरकर सन्मानित

कार्य गौरव पुरस्काराने प्रशांत जेजुरकर सन्मानित

January 8, 2025
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

कार्य गौरव पुरस्काराने प्रशांत जेजुरकर सन्मानित

YOU MAY ALSO LIKE

नाशकातील अमरधाम जवळ भल्या पहाटे भीषण अपघात

शाळा, महाविद्यालय परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवा;सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नाशिक मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार सोहळा संपन्न

नाशिक : पत्रकार दिनानिमित्त जेलरोड येथील राज राजेश्वरी मंगल कार्यालयात मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.यावेळी कार्य गौरव पुरस्कार 2025, दिशा न्यूज चे पत्रकार प्रशांत चंद्रभान जेजुरकर यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून इंजिनिअर शेखर ढिकले, एकलहरे गावचे ग्रामपंचायत सदस्य सागर जाधव, शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव रतन चावला, साहेबराव खर्जुल, दत्तात्रय धात्रक, नाशिक रोड देवळाली शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष योगेश गाडेकर, प्रशांत कळमकर, अभय खालकर, माजी नगरसेवक पंडित आवारे, माजी नगरसेविका संगीता गायकवाड, हेमंत गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार मोतीराम पिंगळे, अध्यक्ष सुनील पवार, नरेंद्र पाटील, माजी अध्यक्ष सुधाकर गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी म्हणाले सर्वांना योग्य दिशा देण्याचे कार्य करणारे पत्रकार समाजाला आपल्या लेखणीने सशक्त करत असतात. सामाजिक स्वास्थ जपण्याबरोबरच पत्रकारांनी स्वतःच्या आरोग्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शेखर ढिकले म्हणाले की लेखणीचे सामर्थ्य हे समाजात सर्वात महत्त्वपूर्ण आहे कुठल्याही कार्यक्रमाचे मोजमाप हे त्या बातमीच्या प्रसिद्धीवरून कळत असते. या क्षेत्रात पत्रकारांचे महत्त्व अनन्य साधारण आहे. यावेळी ग्रामीण भागातील सामाजिक कार्यकर्ते सागर जाधव यांच्या माध्यमातून पत्रकारांसाठी उपलब्ध करून दिलेली विमा पॉलिसी संस्थापक अध्यक्ष मोतीराम पिंगळे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. नाशिक मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील पवार यांनी प्रास्ताविक तर रवींद्र माळुंजकर यांनी सूत्रसंचालन केले. अरुण बिडवे यांनी आभार मानले मान्यवरांच्या हस्ते फणींद्र मंडलिक (महाराष्ट्र टाइम्स) नरेंद्र जोशी (देशदूत) दिलीप सोनार (गावकरी) तुषार माघाडे (सकाळ) नरेंद्र दंडगव्हाळ (लोकमत) विजय गीते (पुण्यनगरी), प्रदीप गायकवाड (दिव्यमराठी ), नाना खैरनार (भ्रमर ), स्वप्निल लेकुरवाळे (आपलं महानगर), दिलीप सूर्यवंशी (पुढारी), कुंदन राजपूत (लोकनामा), सुधीर पेठकर (नवराष्ट्र), संजय देवधर (न्यूज मसाला ), संदीप नवसे (जागर जनस्थान ), साहिल बेलसरे (9 न्यूज महाराष्ट्र) , प्रशांत जेजुरकर (दिशा न्यूज), तेजस्विनी ताकाटे (एनसीएन न्यूज) यांसह वृत्तपत्र विक्रेते भाग्यश्री माळवे ( नाशिकरोड ), प्रकाश गोडसे (देवळाली कॅम्प ) ज्ञानेश्वर वाघ ( जेलरोड ), मीना वाकचौरे ( गिरणारे ) आदींसह विशेष पुरस्कार्थींमध्ये सरस्वती मित्र मंडळ (देवळाली कॅम्प), वैभव ग्रामीण पतसंस्था (पळसे), आदिशक्ती मित्र मंडळ (माडसांगवी ), विचारक्रांती वाचनालय (जाखोरी), रॉयल रायडर्स (सायकल समूह ), हरिनाम सप्ताह कमिटी (शिंदे ), गजानन महाराज महिला भजनी मंडळ ( भगूर ), स्व.गणेश धात्रक शिक्षण संस्था (जेलरोड), हॉलिफ्लॉवर इंग्लिश मीडियम (नाशिकरोड), शुभम शिंदे (पळसे ), प्रवीण लकारिया (भगूर), भक्ती कोठावळे (नाशिक), संगीता पिंगळे (मातोरी), शिवाजी माळोदे (नांदूर), दिनेश निकम (जेलरोड), कैलास धात्रक (जाखोरी), किरण गायकवाड (नाशिकरोड), पंकज शेलार (विजयनगर) राजेंद्र खर्जुल (नाशिकरोड), वामनराव घोडे (चेहडी) आदींचा कार्यगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यशस्वीतेसाठी अरुण तुपे, प्रवीण आडके, दीपक कणसे, वसंत कहांडळ, संजय निकम, प्रकाश उखाडे, संतोष भावसार, नंदकुमार शेळके, प्रशांत धिवंदे, उमेश देशमुख, हरिष बोराडे, भास्कर सोनवणे, नथू ढिकले आदिंसह सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास नागरिक आणि पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Loading

Previous Post

नाशिक पोलिसांच्या आठ वाहनांचा मध्यरात्री थरार

Next Post

मुख्यमंत्र्यांकडून नाशिक पोलिसांचे अभिनंदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White