• Latest
  • Trending
नाशिकच्या IT कंपनीतील भयंकर घटना, लैंगिक अत्याचार ते तरुणाचे धर्मांतर

कंपनीत काम करणाऱ्या पिढीतेंचा हादरवणारा जवाब

April 22, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

कंपनीत काम करणाऱ्या पिढीतेंचा हादरवणारा जवाब

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

गुढीपाडव्याला साडीचा पदरही ओढला हिंदू देवी देवतांबद्दल अपशब्द

नाशिक : नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीत ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेत पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीनंतर आयोगाच्या समितीने 2 दिवसांपासून नाशिकमध्ये तळ ठोकला होता. कंपनीच्या कॅम्पसमध्ये जाऊन या प्रकरणाची सखोल चौकशी महिला आयोगाच्या पथकाकडून करण्यात आली आहे. या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत.विशेष म्हणजे महिला आयोगाच्या या तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. एका पीडितेने महिला आयोगाच्या शिष्टमंडळाकडे आपल्यासोबत घडलेला धक्कादायक प्रकार कथन केला  आरोपींच्या दबावात तिला किती मानसिक आणि शारिरीक त्रासाला सामोरं जावं लागलं याचं कथन पीडितेने केलं आहे. पीडितेने सांगितलेला प्रकार धक्कादायक  आणि संताप  आणणारा आहे. पीडित तरुणीचे वडील कर्करोग सारख्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्या केमोथेरपीसाठी तिला पैशांची नितांत गरज होती. तिच्या याच हतबलतेचा फायदा कंपनीतील काही वरिष्ठ सहकाऱ्यांनी घेतला. मदतीच्या बहाण्याने तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्यात आला. तसेच तिचे लैंगिक शोषण आणि मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप देखील तिने केलेल्या तक्रारीत केला आहे.त्याचबरोबर  वरिष्ठ अधिकारी रजा मेनन आणि आसिफ अन्सारी हे महिला कर्मचाऱ्यांचा मानसिक व शारीरिक छळ करत होते. “तुझी शरीरयष्टी (फिगर) आकर्षक आहे, गरज पडली तर कधीही बोलावू,” अशा शब्दांत हे अधिकारी जाहीरपणे टिप्पणी करत असत. धक्कादायक बाब म्हणजे, हिंदू संस्कृतीतील अत्यंत पवित्र अशा ‘गुढीपाडवा’ सणाच्या दिवशी रजा मेनन याने पीडितेच्या साडीचा पदर ओढून तिचा विनयभंग केला. तिने मागे वळून पाहिल्यावर त्याने अत्यंत ओंगळवाण्या नजरेने तिच्याकडे पाहून हास्य केल्याचे पीडितेने नमूद केले आहे. धार्मिक श्रद्धांवर आघात आणि धर्मांतराचा प्रयत्न
या प्रकरणात केवळ लैंगिक छळवणूकच नव्हती, तर कर्मचाऱ्यांच्या धार्मिक श्रद्धांनाही लक्ष्य केले जात होते. आरोपी पीडितेला आणि इतर कर्मचाऱ्यांना “तुमचा महादेव खरोखरच देव आहे का?” किंवा “गणपती हे महादेवाचे पुत्र आहेत का?” अशा प्रकारचे प्रश्न विचारून त्यांच्या धर्माची थट्टा करत असत. हिंदुत्वाचा अपमान करून हळूहळू धर्मांतरासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न या टोळीकडून केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. मानसिक खच्चीकरण आणि ‘प्लेअर’ संबोधनाचा वापर
जबाबातील माहितीनुसार, आसिफ अन्सारी कार्यालयात जागा उपलब्ध असतानाही जाणीवपूर्वक पीडितेच्या जवळ येऊन बसायचा आणि लज्जास्पद स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा. रजा मेनन हा पीडितेला कार्यालयात “काय चाललंय प्लेअर?” असे संबोधून टोमणे मारायचा. कामात मदत करण्याच्या बहाण्याने तिला जवळ बोलावणे, घाणेरड्या कमेंट्स करणे आणि सतत मानसिक दडपणाखाली ठेवणे, असा प्रकार या कंपनीत सुरू होता. निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव, माजी पोलीस महासंचालक बी.के. सिन्हा आणि वकील मोनिका अरोरा यांच्या उच्चस्तरीय समितीने कंपनीत जाऊन वरिष्ठ व्यवस्थापनाची चौकशी केली आहे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि अश्लील पासवर्डचा धक्कादायक प्रकार
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अंतर्गत संवाद साधण्यासाठी काही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केले होते. या ग्रुप्समध्ये दररोज आक्षेपार्ह संदेश पाठवून तरुणींचा विनयभंग केला जात असे. इतकेच नव्हे, तर कार्यालयातील इंटरनेटचा (वाय-फाय) पासवर्ड देखील अश्लील शब्दांत किंवा हिंदू तरुणींच्या धार्मिक भावना दुखावतील अशा पद्धतीने ठेवला जात होता. शफी शेख आणि रझा मेमन या आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी आपल्या मोबाईलमधील बराचसा डेटा हटवल्याची (डिलिट) दाट शक्यता आहे. त्यामुळे तपास यंत्रणा आता हे तांत्रिक पुरावे पुन्हा मिळवण्यासाठी सायबर तज्ज्ञांची मदत घेत आहे.

Loading

Previous Post

खरात प्रकरणाला धक्कादायक वळण, निकटवर्तीयाचा अपघाती मृत्यू

Next Post

नाशिकमध्ये आणखी एक अशोक खरात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White