• Latest
  • Trending
गोड बातमी, लोन स्वस्त अन् EMI होणार कमी

नाशिकमध्ये आणखी एक अशोक खरात!

April 23, 2026
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

नाशिकमध्ये आणखी एक अशोक खरात!

YOU MAY ALSO LIKE

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

विधी करण्याच्या नावाखाली महिलेला लॉजवर नेऊन बलात्कार

नाशिक : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण चर्चेत असतानाच आता निफाड तालुक्यातील धरणगाव (खडक) येथील एका भोंदूबाबाचा काळा कारनामा उघडकीस आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कौटुंबिक समस्या दूर करण्याचे आणि भूतबाधा उतरवण्याचे आमिष दाखवून एका महिलेचे लैंगिक शोषण करणाऱ्या महेशगिरी महाराज उर्फ महेश दिलीप काकडे याच्यावर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित महिलेचे कुटुंब घरगुती ताणतणाव आणि मुलीच्या लग्नातील अडथळ्यांमुळे त्रस्त होते. यावर तोडगा काढण्यासाठी ते धरणगाव येथील महेशगिरी याच्या तथाकथित ‘प्रति गाणगापूर’ मठात गेले. यावेळी भोंदू महेशगिरीने महिलेला “बाहेरची बाधा” असल्याचे सांगून मनात भीती घातली. विधीच्या नावाखाली तिला पापनाशक कुंडात अंघोळ घालण्यास लावून, ओल्या वस्त्रानिशी उंबराच्या झाडाला फेऱ्या मारण्यास भाग पाडले त्यांनंतर काही दिवसांनी या भोंदूने पीडितेचा मोबाईल नंबर मिळवून तिला व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. “दैवी विधी आणि मार्गदर्शनासाठी एकांतात यावे लागेल” असे सांगून त्याने पीडितेला नाशिकमध्ये बोलावून घेतले. तिथून तिला नाशिक-त्र्यंबक रोडवरील एका लॉजवर नेले. “माझ्या गळ्यात रुद्राक्ष आहे, माझ्यात दैवी शक्ती आहे, माझे कोणी काही करू शकत नाही,” अशी धमकी देऊन त्याने तिच्यावर अत्याचार केला आणि तिचे आक्षेपार्ह फोटोही काढले.पीडित महिला सुरुवातीला गप्प होती. यानंतर तिने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. डॉ. टी. आर. गोराणे आणि कृष्णा चांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकार नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या कानावर घालण्यात आला. पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार, लासलगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून महेशगिरी काकडे विरोधात जादू टोनाविरुद्ध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. या भोंदुबाबाने आणखी महिला व तरुणींचे लैंगिक शोषण केल्याची शक्यता अंनिस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

Loading

Previous Post

कंपनीत काम करणाऱ्या पिढीतेंचा हादरवणारा जवाब

Next Post

नाशिकमधील दोन महिला गुन्हेगारांनी पोलिसांना दिले मोठे आव्हान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White