जितेंद्र शेळके यांचा हा अपघात आहे की घातपात? असा संशय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केला

नाशिक : अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचे अपघाती निधन झाले आहे. समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला.अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना धोत्रे गावाजवळ अपघात झाला. उभ्या कंटेनरला जितेंद्र शेळके यांच्या कारने पाठीमागून धडक दिली. कार थेट कंटेनरखाली घुसली. अपघातात जितेंद्र शेळकेंचा मृत्यू तर पत्नी आणी मुलगा गंभीर जखमी झाले. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर शंका आणि अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. *कोण होते जितेंद्र शेळके?* डॉ जितेंद्र गणपतराव शेळके हे शिर्डीतील नावाजलेले उद्योजक होते. डॉ.शेळके यांची शैक्षणिक संस्था आणि सिल्व्हर ओक डेव्हलपर्स नावाने व्यवसाय करत. सात ते आठ वर्षांपासून जितेंद्र शेळके हे अशोक खरातचे भक्त होते. 2023 मध्ये अशोक खरातच्या शिवनिका संस्थान ट्रस्टचे सदस्य झाले. 2025 मध्ये शिवनिका संस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष झाले. अशोक खरात याच्या शिर्डीतील जमीन व्यवहार प्रकरणामध्ये शेळके हे साक्षीदार होते. अशोक खरात याच्या अटकेनंतर शिर्डी पोलिसांकडून जितेंद्र शेळके यांची चौकशी झाली होती.अशोक खरात प्रकरण उघड झाल्यानंतर शेळके तणावात असल्याची माहिती समोर आली होती. श्री क्षेत्र माहूर येथून समृद्धी महामार्गाने शिर्डीकडे परतत असताना कारला भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर कोपरगाव वैजापूर हद्दीत कंटेनर आणि शेळकेंच्या कारच्या भीषण अपघात त्यांचा मृत्यू झाला. संशय आणि राजकीय प्रतिक्रिया अशोक खरात प्रकरणातला हा पहिला अपघात. आता याची सुरुवात झाली. जितेंद्र शेळके यांचे सिल्व्हर ओक लॉंज मंगल कार्यालय होते. 3 दिवसांपुर्वी ईडीकडून चौकशी झाली होती. आज जर त्यांचा मृत्यू होत असेल तर हे खूप धक्कादायक आहे. दीपक लोंढे यांची चौकशी सुरु आहे, सचिन सुंभाले, बाळासाहेब बोऱ्हाडे या तिघांना सरकारकडून सुरक्षा दिली पाहिजे. पुरावे देऊ नये म्हणून उडवून टाकायचे असे बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही सुरु आहे का? असा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केला. जितेंद्र शेळके यांनी ईडीला बऱ्यापैकी माहिती त्यांनी दिली असेल. पण आणखी माहिती देऊ नये म्हणून अपघात केलाय का अशी भीती अंजली दमानिया यांनी व्यक्त केलय. यामागे कोण सूत्रधार आहे हे सांगता येणार नाही सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला संशय– जितेंद्र शेळके याच्या मृत्यू चि बातमी शॉकिंग आहे. अनेकांनी अंदाज वर्तवले होते की खरात किंवा त्याच्या निकटवर्तीयांच्या जीवाला धोका आहे. असंख्या लोकांनी आपलं म्हणणं मांडलं होतं. आता ही घटना घडणे हे कुठेतरी त्या सगळ्या गोष्टी खऱ्या करणाऱ्या आहेत. यानिमित्ताने खरातच्या जीवाताच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेळकेच्या मृत्यूमुळे अनेक गोष्टी बाहेर येता येता राहतील की काय? अशी आता भीती वाटत आहे. असं सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.
तसेच “आता माझ्या हाताशी काही नाही. मात्र यात घातपाताचा वास येत आहे. अशी भीती आधीच अनेकांनी व्यक्त केली होती. शिवनिका ट्रस्टच्या लोकांचे एकमेकांशी लागेबांधे आहेत. त्यामुळे सर्वांच्याच जीवाताच्या सुरक्षिततेचा प्रश्न यातून निर्माण होत आहे. खरातच्या जीवीताला धोका होऊ शकतो याला अधिक अधोरेखित करण्याचं काम या घटनेमुळे झालं आहे.” असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

![]()












