• Latest
  • Trending

एक चुक… आणि सर्व कुटुंबच वाहून गेलं….

July 1, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Saturday, October 17, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

एक चुक… आणि सर्व कुटुंबच वाहून गेलं….

YOU MAY ALSO LIKE

नाशकातील अमरधाम जवळ भल्या पहाटे भीषण अपघात

शाळा, महाविद्यालय परिसरातून भटक्या कुत्र्यांना हटवा;सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

धोकेदायक ठिकाणी सेल्फी घेणे व रिल्स बनवणे टाळा..

नाशिक :पावसाळा सुरू झाला की निसर्गाचे सुंदर रूप पाहण्याची इच्छा प्रत्येक व्यक्तीला होत असते. पावसाळ्यात फिरायला जात असताना, डोगर दर्यात असलेले धबधबे नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात मात्र ही मजा घेताना आपण स्वतःसाठी व कुटूंबासाठी धोका तर निर्माण करत नाही ना याचा विचार प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे.काल राज्यातील लोणावळा येथे भयंकर घटना घडली. लोणावळा येथील भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या धबधब्याच्या प्रवाहात एकाच कुटूंबातील चार मुले व एक महिला असे पाचजण वाहून गेले. ज्यावेळी जीवन मरणाचा संघर्ष सुरू असताना कुठल्या तरी व्यक्तीने याचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल होताच बघणाऱ्यांच्या अंगावर काटाच उभा राहिला. कारण जबरदस्त अश्या वाहत्या पाण्यात पूर्ण पाच जणांच कुटूंब अडकलेल होत त्यात लहान मुलांचा देखील समावेश होता .ज्या अपेक्षेने संपूर्ण कुटुंब कुणीतरी आपला जीव वाचवेल या आशेने असाह्य बराच वेळ तग धरून उभे होते. आजूबाजूच्या नागरिकांनी या कुटुंबाला वाचवण्याचा बराच प्रयत्न केला मात्र खळखळत्या जोरदार पाण्याच्या प्रवाहात जाण्याची कुणाची हिंमत झाली नाही. आणि अखेर सर्वांच्या डोळ्यादेखत हे कुटुंब पाण्यात वाहून गेलं. अन्सारी परिवारातील 15 जण वर्षाविहारासाठी आले होते. धरणाच्या पूर्वेकडील प्रवाह मुले खेळत होती पावसाचा जोर जास्त असल्याने प्रवाहातील पाण्याचा वेग वाढत होता. कुटुंबाला त्याचा अंदाज आला नाही. मुले प्रवाहाच्या वाहून गेली. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करताना नुरांसारी याही वाहून गेल्या. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना वाचविणे इतरांना शक्य झाले नाही. पुण्याच्या हडपसर भागात राहणारे अन्सारी कुटुंब लग्न समारंभावरून येत असताना भुशी डॅम मध्ये वर्षाविहारासाठी उतरले होते. मात्र या ठिकाणी वर्षा विहारासाठी जाणे लोक टाळतात हे अन्सारी कुटुंबाला ठाऊक नव्हतं. हे कुटुंब ज्या ठिकाणी उतरले होते त्या ठिकाणी तीन धबधबे आहेत हे तिघेही धबधबे एकत्र येऊन मिसळतात. पुढे हे पाणी डॅम मध्ये जाऊन मिळते याची अन्सारी कुटुंबाला या ठिकाणची कुठलीच माहिती नव्हती. ते ज्यावेळी पाण्यात उतरले त्यावेळी अवघ्या दहा मिनिटांच्या कालावधीत धबधबे असलेल्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात पाऊस सुरू झाला. यामुळे पाण्याचा प्रवाह भयंकर वाढला त्यामुळे या तीनही धबधब्यांमधून पाणी खालच्या दिशेने वेगाने वाहू लागले ज्यावेळी पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढला त्यादरम्यान कुटुंबाला याची जाणीव झाली मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला होता अखेर 10 जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. त्यापैकी पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर उर्वरित पाच जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. चौघांचे मृतदेह सापडले असून एकाचा मृतदेह सापडवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पावसाळ्यात असे जीवघेणे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. पावसाळ्याचा आनंद घेताना आपल्या कुटुंबाबरोबर बाहेर जात असताना धोकादायक ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. त्याचबरोबर शासनाच्या नियमांचे पालन केले पाहिजे. जीव धोक्यात घालून सेल्फी काढणे निसरड्या धबधब्यांवर जाणे. कुठली माहिती नसताना अनोळखी, एकांत व धोकेदायक ठिकाणी आपल्या कुटूंबासोबत जाणे चुकीचेच आहे. ,त्याचबरोबर रिल्स बनवण्यासाठी अनेक तरुण-तरुणी आपला जीव धोक्यात टाकत असतात हे देखील थांबवले पाहिजे . घडलेल्या घटना बघता यातून नागरिकांनी व तरुण-तरुणींनी बोध घेतला पाहिजे. अन्यथा काही क्षणांच्या आनंदासाठी आपल्या प्रियजनांचा जीव धोक्यात घालू नका .जाताना खबरदारी घ्या जेणेकरून अश्या घटना घडणार नाही न्यूज ब्लॅक अँड व्हाइट च्या वतीने हे एक आवाहन नागरिकांसाठी

Loading

Previous Post

“मध्यरात्री”पासून केंद्र सरकारचा कठोर कायदा लागू…..

Next Post

महाराष्ट्रातील या शहरात पहिला गुन्हा दाखल….

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White