वीज वारंवार गुल का होते ?बैठकीत नागरिकांचा प्रश्न

इंदिरानगर : वडाळा गाव, इंदिरानगर परिसरात सतत वीज का जाते ? या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आता सर्वच राजकिय पक्ष सरसावले असून सुरवातीला भाजपा आमदार फरांदे आणि भाजपा नगरसेवकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले आणि आता हाच जाब विचारण्यासाठी ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्ते सरसावले आहेत. परिसरात सारखी वीज जात असल्याने हा प्रश्न गंभीर झाल्याचा आरोप करत काल वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी समोरा-समोर येऊन चर्चा करावी यासाठी वीज ग्राहकांची बैठक सायंकाळी राजसारथी सोसायटीत बोलावण्यात आली होती. मात्र या बैठकीला आमंत्रण देऊनही वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारली. तासभर वाट पाहूनही कुठलाही अधिकारी आला नसल्याने बैठक आटोपती घ्यावी लागली अखेर पुन्हा सोमवारी नाशिकरोड येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या बैठकीत ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते यांनी मार्गदर्शन केले यावेळी बोलताना वसंत गिते म्हणाले हा प्रश्न आम्ही कायमस्वरूपी सोडविणार आहोत .या बैठकीला देवानंद बिरारी, संजय गायकर,परशुराम निकम, कैलाश जाधव, बाळकृष्ण शिरसाठ रमेश नागरे, पंकज कराड, आदित्य दुसाने गौरव सोनार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .या बैठकीसाठी ऋषी वर्मा व रमेश पठाण यांनी विशेष प्रयत्न केले .

![]()











