• Latest
  • Trending
इंदिरानगरच्या जॉगिंग ट्रॅकमध्ये  पहाटे एमडी ड्रग्ज जप्त

इंदिरानगरच्या जॉगिंग ट्रॅकमध्ये पहाटे एमडी ड्रग्ज जप्त

December 7, 2024
शुद्ध हवा विसरा… नाशिकची  हवा ‘अस्वस्थ’ करणारी

शुद्ध हवा विसरा… नाशिकची हवा ‘अस्वस्थ’ करणारी

October 16, 2026
त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

त्र्यंबकेश्वरमध्ये 31 फूट सिंहस्थ ध्वजस्तंभाचे पूजन

October 15, 2026
पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

पक्षासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी मिळणार पदे ?

October 15, 2026
नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

नासिक मध्ये दोन कोटींचा रुग्ण घोटाळा तीन हॉस्पिटल्स वर गुन्हा दाखल

October 14, 2026
जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

जिनिव्हाच्या जागतिक मंचावर घुमला नाशिकच्या महापौरांचा आवाज

October 13, 2026
नाशकात शिंदे गटाच्या नेत्यावर कोयत्याने हल्ला

कायद्याच्या बालेकिल्ल्यात तरुणांवर कोयत्याने आणि पेवर ब्लॉक ने हल्ला

October 13, 2026
नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

नाशिकच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पोलिसांवर नाराज…

October 11, 2026
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा  कायापालट होणार-मुख्यमंत्री

नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कायापालट होणार-मुख्यमंत्री

October 11, 2026
भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

भविष्यात गणेश आणि नवरात्र उत्सव मंडळांची संख्या कमी होण्याची शक्यता ?

October 11, 2026
नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

नाशिकच्या खड्ड्यांनी घेतला तेरावा बळी; नातेवाईकांचा आरोप

October 9, 2026
‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

‘नटसम्राट’ची एक्झिट! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026
महापालिकेत “उद्यान” घोटाळा

महापालिकेत “उद्यान” घोटाळा

October 7, 2026
News Black & White
Sunday, October 18, 2026
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय
No Result
View All Result
News Black & White
No Result
View All Result

इंदिरानगरच्या जॉगिंग ट्रॅकमध्ये पहाटे एमडी ड्रग्ज जप्त

YOU MAY ALSO LIKE

अखेर नगरसेवक प्रविण तिदमे यांची नाराजी दूर

नासिकमध्ये महिला नेत्याने उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि…….

जॉगिंगट्रॅक लगत एमडी ड्रग्जचे जाळे असल्याची चर्चा

नाशिक : शहरातील साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅक येथे एमडी ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई करण्यात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाला मोठे यश आले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून एमडी ड्रग्ज प्रकरणी नाशिकचे नाव चर्चेत आहेत .एमडी ड्रग्जचा मास्टरमाइंड ललित पाटील हा गजाआड असून नाशिकच्या शिंदे गावात एमडीसारख्या कुख्यात ड्रग्जचे कारखाने बिनबोभाट सुरू असल्याचे आढळल्याने नाशिक नशेचं नवं डेस्टिनेशन बनल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते.यादरम्यान पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. त्याचबरोबर इंदिरानगर परिसरातील वडाळा गावातील छोटी भाभी कनेक्शन देखील समोर आल्याने मोठी खळबळ उडाली होती. काही महिन्यांपूर्वी वडाळागावात छोटी भाभी उर्फ नसरीन शेख हिचा एमडी ड्रग्जचा अड्डा उध्वस्त केला होता या प्रकरणात संशयित चिपड्या उर्फ इरफान नूर मोहम्मद शेख (30 रा वडाळागाव) यास अटक केली होती. यादरम्यान चिपड्यावर राजकीय वरदस्त असल्याची जोरदार चर्चा होती. विधानसभेच्या निवडणुकीत देखील या मुद्यांवर आक्रमक प्रचार करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे अमली पदार्थविरोधी पथकाचे ताजने यांना गुप्त माहिती मिळाली होती की इंदिरानगर परिसरातील साईनाथनगर चौफुलीलगत जॉगिंग ट्रॅकमध्ये काही व्यक्ती एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार आहेत त्यानुसार गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने भल्या पहाटे तीन वाजेच्या सुमारास सापळा रचला या सापळ्यात अजय भिका रायकर (34) अल्ताफ पिरण शहा (35) मोसीन हनिफ शेख (36) तिघेही राहणार म्हाडा बिल्डिंग वडाळा गाव त्याचबरोबर आकर्षन रमेश श्रीश्रीमाळ(30) राहणार तारवाला नगर यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीचे 61.5 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. त्याचबरोबर दोन मोबाईल देखील हस्तगत करण्यात आले आहेत मुख्य म्हणजे दोन ते तीन वर्षांपासून एमडी ड्रग्जची चर्चा असताना आज देखील इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात कॅफे, हॉटेल, पानटपऱ्या या ठिकाणी अनेक तरुण-तरुणींचे घोळके असतात या कॅफेनमध्ये सिगारेटच्या धुरांच्या झुरक्या आड एमडी ड्रग्जचे व्यवहार होत असल्याची चर्चा खुद्द वडाळागावात होत असून सुरवातीच्या काळात पोलिसांनी लक्ष घालत या कॅफेचालकांना समज दिली होती मात्र त्यानंतर पुन्हा असे प्रकार इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असल्याची चर्चा परिसरात असून यासाठी लगत असलेल्या सायकल ट्रॅकचा वापर होत असल्याचे समजते.

Loading

Previous Post

नाशिकच्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन ?

Next Post

इडलीच्या हातगाडीला लाथ मारली म्हणून केले ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Search

No Result
View All Result
  • About
  • advertise
  • Privacy & Policy
  • Contact Us

© 2024 Black & White

No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • देशविदेश
  • क्रीडा
  • राजकीय
  • विविध
  • शेअर बाजार
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • संपादकीय

© 2024 Black & White